Share

आर्यन खानच्या अडचणी आणखी वाढल्या, १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी

Published On: 

मुंबई – बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या अनेक दिवसांपासीन आर्यन खान NCB च्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान त्याला जामीन मिळावा यासाठी त्याचे वकील सतीश मानशिंदे यांनी आज कोर्टात न्यायाशीधांसमोर विविध प्रकारे बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र आर्यन खान सह सर्व आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझवर ड्रग्ज पार्टी केल्याच्या आरोपावरून शनिवार, २ ऑक्टोबरपासून एनसीबीच्या ताब्यात आहे. आज आर्यनची कोठडी आज संपणार होती. त्यामुळे त्याला आज मुंबईतील न्यायालयात हजर करण्यात आले होते. आर्यनच्या वकीलांनी पुन्हा एकदा जामीन याचिका दाखल केली होती. मात्र सुनावणीअखेर न्यायालयाने आर्यनची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचे नाव आल्यानंतर संपूर्ण भारतात खळबळ उडाली होती. न्यायालयात हजर केल्यानंतर आर्यनला पहिल्यांदा एक दिवस आणि नंतर तीन दिवस असे एकूण चार दिवस कोठडी सुनावण्यात आली होती. आजही एनसीबीच्या वकिलांनी आर्यन खानसह इतर आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. त्यानंतर कोर्टाने न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, या प्रकरणात आणखी काहीजण अडचणीत आले आहेत. अब्दुल कादिर शेख, श्रेयस नायर, मनीष दर्या आणि अविन साहू अशी या नव्या आरोपींची नावे असून त्यांना मंगळवारी मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टात हजर करण्यात आले. त्यांना ११ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!