🕒 1 min read
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील तिनही पक्षांमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे काहीतरी शिजत असल्याचं बोललं जात आहे. कारण, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीगाठींचे सत्र सध्या अधिक वाढले आहे.
काल राऊत पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओक बंगल्यावर गेले. या भेटींमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. महाविकास आघाडीमध्ये काही प्रमाणात तणाव वाढला असतानाच संजय राऊत हे गेल्या काही दिवसात सातत्याने पवारांच्या भेटीस जात असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, आज पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी या भेटींबाबतच्या प्रश्नांना त्यांच्या शैलीत उत्तर दिलं आहे. ‘उद्धव ठाकरे हे जरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असले तरी ते शिवसेनेचे प्रमुख देखील आहेत. त्यामुळे मी भेटीला जातो. मी पवार साहेबांना गेली अनेक वर्षे भेटतोय. मला त्यांना भेटायला आवडतं. मला त्यांच्याशी बोलायला, विषय समजून घ्यायला आवडतं. त्यामुळे मी त्यांना भेटतो. मात्र प्रत्येक भेटीला राजकीय विषय आहे असा अर्थ काढणं चुकीचं आहे,’ असं सांगतानाच, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्य उत्तम सुरु आहे. त्यांच्या लोकप्रियतेचा महाविकास आघाडी सरकारला देखील फायदा होतोय.’ हे देखील त्यांनी आवर्जून नमूद केलंय.
महत्वाच्या बातम्या
- ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांना ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा अधिक धोका – WHO
- आयपीएलमध्ये परदेशी खेळाडू खेळवण्यासाठी बीसीसीआयचे प्रयत्न
- ‘माझं वय ७२ वर्ष, आजही चौकशीला हजर राहू शकत नाही’; अनिल देशमुखांच ईडीला पत्र
- ‘…हे पुणेकर चांगलंच लक्षात ठेवतील’; पुण्याच्या प्रश्नांसंदर्भातील बैठकीत महापौरांनाच डावललं
- ‘अनिल देशमुखांना आता कोरोना आठवतो? पैसे खाल्ले तेव्हा नव्हता का कोरोना?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
