Share

“… त्यामुळे उपोषणाशिवाय माझ्याकडे पर्यायच राहिला नाही”, संभाजीराजेंची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणासाठीतसेच इतर मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे आजपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. (Chhatrapati Sambhaji strike for Maratha reservation) याला संपूर्ण राज्यभरातून पाठींबा मिळत आहे. दरम्यान सरकारने शब्द पाळला नाही. त्यामुळे उपोषणाशिवाय माझ्याकडे काहीच पर्याय राहिला नाही. म्हणूनच मी आजपासून उपोषणाला बसलो आहे, असं ते यावेळी म्हणाले आहेत.

मराठा आरक्षण कधी मिळेल ते सांगता येत नाही. त्यासाठी वेळही लागू शकतो. पण आम्ही सात मागण्या केल्या होत्या. त्यापैकी एकही मागणी सरकारने पूर्ण केली नाही. १५ दिवसात या मागण्या मंजूर करतो म्हणून सरकारने सांगितलं होतं. पण अजूनही त्यावर तोडगा निघाला नाही. त्यानंतर रायगड आणि नांदेडलाही आंदोलन करण्यात आले, मात्र सरकारने त्याची दखल घेतली नाही. म्हणून उपोषणाशिवाय माझ्याकडे काही पर्यायच राहिला नाही. असे खासदार संभाजी छत्रपती यांनी म्हटले आहे.

दरम्यान २०१३ साली आम्ही लाखोच्या संख्येने मोर्चा काढला. त्यानंतर राणे समिती आली आणि आरक्षण मिळालं. ते टिकलं नाही. त्यानंतर २०१७ साली आझाद मैदानात मोर्चा निघाला. त्यावेळी स्टेजवर जाण्याचे कुणाचं धाडस नव्हतं. हिंदू-मुस्लिम, दलित-मराठा, ओबीसी-मराठा वाद होण्याची त्यावेळी दाट शक्यता होती. त्यावेळी इंटेलिन्स विभाग आणि समन्वयकांनी मला स्टेजवर जायला सांगितलं. तुम्ही स्टेजवर गेला नाही तर गालबोट लागेल असं सांगितलं. त्यामुळे मी स्टेजवर गेलो आणि दोन मिनिटात मनोगत मांडलं. लोकांनी माझं म्हणणं ऐकलं आणि लोकं परत गेली. असेही संभाजी राजे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!