Share

मी ठरवलं आहे जे माझ्या स्तराचे असतील त्यांच्यावरचं मी बोलेल; पाटलांचा राऊतांना टोला

Published On: 

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोवा विधानसभेच्या ४० जागांपैकी २२ जागांवर शिवसेना उमेदवार देणार असल्याची घोषणा केली. बुधवारी राऊत यांनी ही घोषणा केली. तसेच गोव्यामध्ये शिवसेनेचं सरकार आलं तर शिवसेना महाराष्ट्रामधील प्रशासनाप्रमाणे गोव्यामध्येही चांगली कामगिरी करणारं सरकार देईल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. दरम्यान, गोव्यामध्ये मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे निवडणुकीचा प्रचार करतील, असे राऊत यांनी सांगितले. यावर आज बोलतान चंद्रकात पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना गोव्याच २२ जागांवर लढेल. आम्ही पक्ष तोडण्याचे काम करत नाही. जसे गोव्यात झाले आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, “मला काहीच म्हणायचे नाही. आता मी ठरवलं आहे जे माझ्या स्तराचे असतील त्यांच्यावरचं मी बोलेल”, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी नाव न घेता संजय राऊत यांना लगावला आहे.

दरम्यान, हा कॉमन विषय नाही. माझी आणि राज ठाकरे यांची भेट अचानक झाली. नाशिकमध्ये अचानक आम्ही ऐकमेकांच्या समोर आलो. जसे दोन हिंदू मानस चहासाठी भेटतात त्याप्रमाणे मी राज ठाकरेंना भेटलो. याचा मनसे आणि भाजप युती होण्याचा काहीही सबंध नसतो, असं भाजप-मनसे युतीबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!