टीम महाराष्ट्र देशा : थोरात आणि विखे घराण्यांवर माझे सारखेच प्रेम आहे, तसेच शरद पवार साहेबांना देव मानणारा माणूस म्हणून सगळ्या महाराष्ट्रत माझी ओळख आहे. शरद पवारांचे सर्व गुण आमदार रोहित पवारांकडे आले आहेत,तर दिवंगत बाळासाहेब विखेंचे सर्व गुण खासदार डॉ. सुजय विखे यांच्याकडे आले” असे निवृत्ती महाराज देशमुख ( इंदुरीकर ) यांनी आपलं मत व्यक्त करताने म्हटलं आहे.
कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार या कार्यक्रमात म्हणाले, ‘आपल्या खास शैलीतून समाजप्रबोधनाचे काम करणारे, हसता हसता चुकांवर नेमके बोट ठेवणारे, अंधश्रध्देवर प्रहार करुन, शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी सक्रीय प्रयत्न करणारे महाराज समाजात प्रेम आपुलकी, एकोपा निर्माण करीत आहेत. मनातील द्वेषाची जळमटे दूर करण्याचे व केवळ उपदेश करुन नाही, तर प्रत्यक्ष अनाथ, गरजू मुलांसाठी शिक्षण व निवासाची सोय त्यांनी केली आहे. ही आपणासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे.
संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रूक येथे २५ जानेवारी रोजी वाढदिवसानिम्मित आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. इंदुरीकर महाराज यावेळी म्हणाले की, राजकारण आणि धार्मिकता या बाबी रक्तातच असाव्या लागतात. दुसऱ्याचे पाहून या गोष्टी जमत नाहीत असंहि ते म्हणाले .
निवृत्ती महाराजांची घोड्याच्या रथातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत त्यांच्यासोबत रथात शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार आशुतोष काळे, आमदार रोहित पवार, भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील, युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे हेही काहीकाळ आरूढ होते. तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही महाराजांना भेटून शुभेच्छा दिल्या.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
