Share

‘गांधी परिवाराला धोका असतानाही सुरक्षा कमी करताना भाजपला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना झेड श्रेणीची सुरक्षा आहे. त्याऐवजी आता वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, हे वृत्त समोर येताच महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठविण्यात आली आहे. या सर्व टीकांचा काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी चोख समाचार घेतला आहे.

‘भाजपा नेत्यांना धोका नसल्याने सुरक्षा कमी झाली तर आकांडतांडव, आक्रोश, आकांत, विलाप , बोंब इ. भावना उचंबळू लागल्या. परंतु गांधी परिवाराला धोका असतानाही त्यांची व डॉ. मनमोहन सिंहांची सुरक्षा, स्टाफ कमी करताना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. मोदीजींची सूड भावना असते, मविआ सरकारची नाही.’ असा टोला सावंत यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.

दरम्यान,  महाविकास आघाडी सरकारने फक्त विरोधी पक्षातीलच नेत्यांची सुरक्षा कपात केली नसून काँग्रेसचे नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, संजय बनसोडे यांच्या सुरक्षेत देखील कपात केली आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे माजी मुंबई शहर अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांची सुद्धा सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!