मुंबई:- ‘विरप्पन गँगचा एन्काऊंटर करणार’ हे माझं ट्विट अनेक शिवसेना नेत्यांना झोंबले होते. मी आज पुरावे घेवून आलोय की विरप्पन गँग कशी खंडणी वसूल करते, असं सांगत भर पत्रकार परिषदेत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेकडून फेरीवाल्यांना देण्यात आलेल्या पावत्या मांडल्या.
दरम्यान, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचा वीरप्पन टोळी असा उल्लेख केला आहे. आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेची खिल्ली उडवली आहे. आदित्य ठाकरेंनी मनसेचा टाईमपास टोळी म्हणून उल्लेख केला आहे.
“ती संघटना आहे की पक्ष आहे मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्तेही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. मग आपण का द्यावं? ही तर टाईमपास टोळी आहे”, असं मनसेबाबत आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चेंबूरमधील भक्ती पार्क परिसरात मियावाकी बागेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना विविध प्रश्नांना उत्तरं दिली आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीनं शर्जिलला पळून जाण्यास मदत केली’
- भीती आणि दहशतीमुळे काही प्रमुख लोक शेतकऱ्यांना पाठिंबा देत नाहीयेत : संजय राऊत
- पेट्रोल-डिझेलची दरवाढ ही केंद्राच्या हाती; अजित पवारांचे फडणवीसांना प्रत्युत्तर
- “…तेव्हा राष्ट्रभक्तीचा आव आणणारे सर्व सेलिब्रिटी कुठे होते?”
- उत्तरेकडील वाऱ्यामुळे तापमानात घट, परभणीचे तापमान ९.१ अंश

