🕒 1 min read
मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मिडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. हेमंगी तिच्या विनोदी अंदाजामुळे लोकप्रिय आहे. मात्र ट्रोल करणाऱ्यांना ती नेहमीच परखडपणे आपले मत व्यक्त करत असते. अनेक फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडीयावर शेअर करत असते. यावरून अनेकदा तिला ट्रोल करण्यात आले. मात्र या ट्रोल करणाऱ्याना हेमांगी सडेतोड उत्तर देखील देते. नुकतेच तिने शेअर केलेल्या एका फोटोवर केलेल्या कमेंटवर सडेतोड उत्तर दिले आहे.
हेमांगीने तिचे नऊवारी साडीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिच्या या फोटोवर एका बाईने केलेल्या कमेंट पाहून हेमांगीने संताप व्यक्त केला. ‘खूप छान दिसतेस. साधेपणातलं तुझं सौंदर्य छानच. तुझे विचारही खूप छान आहेत. थोडंसं खटकलं- मराठमोळ्या पेहरावावर पदरही नीट घेतला असतास तर अजून छान दिसलं असतं,’ अशी कमेंट एका यावर एका युजर्सकडून करण्यात आली होती.

यावर हेमांगीने कमेंट करत लिहिले की, ‘पदर नीट घेतला असता म्हणजे? हे एक बाईच कसं बोलू शकते? याचं नवल वाटतं मला! ते ही तुमच्या सारख्या स्लीव्हलेस घातलेल्या बाई कडून यावं? मराठमोळ्या संस्कृतीत साडीवर स्लीव्हलेस कधी होता जरा सांगता का? माझं अज्ञान तेवढंच दूर होईल!,’ असा सणसणीत टोला तिनं लगावला. 
त्यानंतर आणखी एक कमेंट करत हेमांगीने लिहिले की, ‘नक्कीच, पण आपण बायका जिकडे लक्ष जाणार नाही किंवा लोकांच्या लक्षातही येणार नाही अशा गोष्टी का अधोरेखित करतो? आणि समजा लक्ष गेलंच तर तो त्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन असू शकतो. लोकांनी मला छानच म्हणावं असा माझा बिलकुल हट्ट नाही. पण नको त्या गोष्टी पॉईन्ट आऊट करणं हे कितपत योग्य? हे सगळ चूक बरोबरच्या नादात आपण आपल्यावर किती अन्याय करून घेतोय हे लक्षातच येत नाहीये बाईकांना! याचाच फायदा मग पुरुष घेतात!,’ अशा कडक शब्दांत तिनं उत्तर दिल आहे.
काही दिवसापूर्वीच हेमांगीची ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या पोस्ट चर्चेत राहिली होती. या पोस्टमध्ये तिने समाजात नेहमी स्त्रीयांवर कपड्यामुळे असणाऱ्या बंधनांच्या प्रश्नावर बेधडक मत मांडले होते. तसेच ती ट्रोल करणाऱ्यांनाही रोखठोक उत्तर देत असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा तिने तिच्या भाषेत ट्रोल करणाऱ्याना उत्तर दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ज्येष्ठ व्यक्तीचा अनादर करणे हे आम्हाला RSS ने शिकवले नाही’ : चंद्रकांत पाटील
- तुमच्यासाठी तो महान क्रिकेटपटू असेल पण माझ्यासाठी तो माझा भाऊ आहे : हार्दिक पांड्या
- ‘आता पेट्रोल दरापेक्षा तुझ्या आयुष्यात जास्त भरभराट होऊ दे अशा शुभेच्छा द्याव्या लागतात’
- ‘पडद्यामागची वसुली चव्हाट्यावर आणली म्हणून इतका थयथयाट बरा नव्हे’, केशव उपाध्येंचा प्रतिटोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
