अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- कर्जत-जामखेडमध्ये आपण ‘वन मॅन-शो’ होतो. पण नगर उत्तरेकडील राजकारणात माझा उगम साडेसहा वर्षांपूर्वी झाला. आमदार होण्यासाठी ज्येष्ठ नेते भानुदास मुरकुटे यांच्याकडे आलो आणि खासदार झालो. शिवसेनेने उमेदवारी दिल्याने, अवघ्या १७ दिवसांत खासदार झालो. श्रीरामपूरच्या राजकारणात कोण कोणासोबत आहे, काहीच कळत नाही.
आता मलाही कळेना, मी कोणासोबत आहे?, असे वक्तव्य शिर्डी लोकसभेचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले आहे. लोखंडे यांनी व्यक्त केलेले मत अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरले आहे. श्रीरामपूर पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या भूमीपूजन सोहळ्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यावेळी खा.लोखंडे बोलत होते.
लोखंडे यांनी खासदार झाल्याचे श्रेय भानुदास मुरकुटे यांना दिले आहे. लोखंडे पूर्वी कर्जत-जामखेडचे आमदार होते. त्यावेळी त्यांना विशेष स्पर्धक नव्हता. निवडून येणे सोपे होते. उत्तरेत मात्र राजकीय मंडळी जास्त आहेत. गट-तट जास्त आहेत. त्यांना तोंड देताना लोखंडे यांना नाकीनऊ झाले असावे. अत्यंत कमी कालावधीत निवडून येण्यामागे त्यांनी शिवसेनाच असल्याचे स्पष्ट केले. तसेच स्थानिक मुरकुटे यांना त्यांनी आपल्या विजयाचे श्रेय दिले.
यावेळी आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, विखे आणि मुरकुटे एकत्रित आल्याने खासदार सदाशिव लोखंडे यांना आपोआप संधी मिळाली. आम्ही जोपर्यंत खंबीर आहोत, तोपर्यंत लोखंडे यांची संधी जाणार नाही. त्यांनी फक्त काळजी घेतली पाहिजे, असे सांगितले. त्यानंतर खासदार लोखंडे यांनीही उत्तरेतील राजकारणावर प्रकाश टाकला.
महत्वाच्या बातम्या
- “एक महिला घरी नसताना तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं यात कोणती मर्दानगी होती?”
- वीज बिल माफी न केल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा बावनकुळे यांचा इशारा
- ईडीची ही कारवाई राजकीय सुडापोटी करण्यात आली, प्रताप सरनाईक यांचा गंभीर आरोप
- 6 वर्षात एकातरी भाजप नेत्याच्या घरावर ईडीने छापा टाकला का ?, काँग्रेसचा सवाल
- तळीरामांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ दिवशी असणार दारू विक्रीस बंदी


