औरंगाबाद : मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापेमारी केल्यानंतर त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना ठाण्यातून ताब्यात घेतले असून, त्यांना सोबत घेऊन गेले आहेत. त्यांना कार्यालयात नेऊन चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर, सरनाईक यांच्या कुटुंबीयांचे ठाण्यातच एक घर आहे. तेथे विहंग यांना ईडीचे पथक घेऊन गेल्याचे कळते.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना आज प्रताप सरनाईक त्यांच्या घरी नाही आहेत. त्यांची मुले घरी आहेत. हे पाहून त्यांनी जी धाड टाकली ही नामर्दांगी आहे. भाजपने सरळ लढाई करावी. हे शिखंडीसारखे यंत्रणांच्या आडून कारवाई करू नका असं सुनावले. तर आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही, असे सांगत या कारवाईवर संतप्त प्रतिक्रिया दिली. यावर आता भाजपकडून देखील प्रत्युत्तर येऊ लागले आहे.
दरम्यान, अंगावर आलं की बोंबलायचं ही शिवसेनेच्या नेत्यांची सवयंच आहे. रोज काही तरी आरोप करायचे, काम कमी आणि आरोप जास्त हेच त्यांचे उद्योग झाले आहे. त्यामुळे त्यांची टिका, आरोप फार मनावर घ्यायची गरज नाही, अशा शब्दांत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसनेनेवर हल्लाबोल केला. दिवाळीत बोंबलायची शिवसेनेला सवयच असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या
- “एक महिला घरी नसताना तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं यात कोणती मर्दानगी होती?”
- वीज बिल माफी न केल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा बावनकुळे यांचा इशारा
- ईडीची ही कारवाई राजकीय सुडापोटी करण्यात आली, प्रताप सरनाईक यांचा गंभीर आरोप
- 6 वर्षात एकातरी भाजप नेत्याच्या घरावर ईडीने छापा टाकला का ?, काँग्रेसचा सवाल
- तळीरामांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ दिवशी असणार दारू विक्रीस बंदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

