सांगली : कोरोनाचं संकट आल्यानंतर राजकीय पक्ष बदल काहीसे थंडावले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला मोठा धक्का देत ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाच पक्षात घेतले. यानंतर, अनेक नेत्यांनी पक्ष बदलण्यास सुरुवात केली असून काही दिवसांवर आलेल्या पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकांवर मोठा परिणाम पडू शकतो. त्यामुळे राजकीय समीकरण जुळवण्यासाठी आता भाजपने देखील काँग्रेसला सुरुंग लावला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सी. बी. पाटील आप्पा यांचे सुपुत्र माजी सरपंच जयराज पाटील काल भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर, सी. बी. आप्पाही लवकरच भाजपमध्ये येतील, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. पुणे पदवीधर मततदार संघाच्या निवडणुकीनिमित्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील आज कामेरी येथे सी. बी. पाटील यांच्या घरी आले होते. यावेळी जयराज पाटील यांना पुष्पगुच्छ दिल्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश झाल्याचे जाहीर करण्यात आले.
दरम्यान, दुसरीकडे राष्ट्रवादीने भाजपला आणखी एक धक्का दिला आहे. माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील आदी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांच्या उपस्थितीत भाजपच्या आणखी एका दिग्गज नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश !
- अंगावर आलं की बोंबलायचं ही शिवसेनेच्या नेत्यांची सवयंच – गोपीचंद पडळकर
- ईडीची ही कारवाई राजकीय सुडापोटी करण्यात आली, प्रताप सरनाईक यांचा गंभीर आरोप
- 6 वर्षात एकातरी भाजप नेत्याच्या घरावर ईडीने छापा टाकला का ?, काँग्रेसचा सवाल
- तळीरामांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ दिवशी असणार दारू विक्रीस बंदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

