Share

‘वेडे लोक बरळत असतात, ते कोणत्या नशेत बरळतात याचा एनसीबीने तपास करावा’

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना त्यांच्याकडून कोणताही पाठिंबा मिळाला नाही असा दावा करताना दुसरा गाल पुढे केल्याने भीक मिळते, स्वातंत्र्य नाही, असं म्हणत कंगनाने अहिंसेची खिल्ली उडवली आहे. तिच्या या वक्तव्यावरुन सर्व क्षेत्रातून तिच्यावर टीका करण्यात आली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही कंगनावर टीका केली आहे.

आता आपण पाहत आहोत की, चीनने आतमध्ये घुसून आपल्या कानाखाली मारली आहे आणि आता दुसरा गालही पुढे करत आहेत. काश्मीरमध्ये पंडितांची हत्या होत आहे. देशात काय परिस्थिती आहे या मॅडमना माहिती असायला पाहिजे. महात्मा गांधी विश्वाचे नायक होते. बाळासाहेब ठाकरे यांनीही गांधींच्या विचारांवर अनेकवेळा टीका केली होती. तरीही महात्मा गांधी स्वातंत्र्य संग्रामचे ते नायक होते हे मानायलाच पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा गांधी जयंतीला राजघाटवर जाऊन गांधीच्या स्मारकावर जाऊन श्रद्धांजली वाहतात. हे या मॅडमना माहित असायला हवं की संपूर्ण देश आणि जग आजही गांधींच्या विचारांनी प्रभावित आहे.

वेडे लोकं बरळत असतात. ते का बरळतात? ते कोणत्या नशेत असतात? त्यांना या नशेचा पुरवठा कोण करतं? एनसीबीने त्याचा तपास करावा ही मागणी आहे, असा टोला राऊत यांनी लगावला आहे. ‘या मॅडमला हे माहीत पाहिजे. आज संपूर्ण देश आणि विश्व गांधी विचारांने प्रभावित आहे’, असं राऊतांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!