पुणे : पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम होण्याच्या दृष्टीने, महापालिकेच्या माध्यमातून पुण्यदशम् – फक्त दहा रुपयांत दिवसभर एसी बसचा प्रवास योजनेचे उद्घाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी महात्मा फुले मंडई ते महापौर निवास पर्यंत बसने प्रवास केला. मेट्रोच्या उद्घाटनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांनी मांडलेल्या भूमिकेचं स्वागत केलं. मी असो की डॉ. भागवत कराड, आम्ही दोघेही मुंडे साहेबांमुळे तयार झालेले कार्यकर्ते आहोत. पंकजाताईंनी मांडलेली भूमिका हीच भाजपाची भूमिका आहे. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि नंतर स्वत: हीच आमची सर्वांची कार्यपद्धती आहे, असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी या चर्चांवर मौन सोडलं असून आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या देशातील आणि राज्यातील नेत्यांचं अभिनंदन करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
‘टीम देवेंद्रमध्ये कोण कोण आहेत, हे मला माहिती नाही. भारतीय जनता पक्षाला टीम देवेंद्र आणि टीम नरेंद्र हे मान्य नाही. पक्षासाठी पक्ष प्रथम… नाही नाही, राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय, तृतीय मी, असं आमच्याकडे आहे. मीपणा पक्षाला मान्य नाही, आमच्या संस्कृतीला, मी-मी असं मान्य नाही. आमच्या पक्षात आम्ही-आपण असं मानतो.’ असं पंकजा मुंडे मुंबईत म्हणाल्या. त्यानंतर पुणे येथे पत्रकार परिषद घेत फडणवीसांनी वरील वक्तव्य केले.
महत्वाच्या बातम्या
- महिन्याभरात एकही रुग्ण न आढळलेल्या गावात १५ जुलैपासून शाळा सुरू होणार-वर्षा गायकवाड
- कोर्टाला सांगितले ‘मी आजारी आहे’, अन् तिकडे खा. प्रज्ञा ठाकूर लग्नात नाचल्या
- ‘संजय राऊत यांची मतं स्ट्राँग आहेत’, ‘सामना’च्या अग्रलेखावर पंकजा मुंडेंचे भाष्य
- ‘पंकजा मुंडेंना संपूर्ण खतम करण्यासाठीच कराडांना मंत्रिपद’, ‘सामना’तून शिवसेनेचा दावा
- बीड, उस्मानाबादच्या हक्काच्या पाण्यासाठी आ.धस यांनी विधिमंडळात उठवला आवाज
- ‘अजित पवारांनी शिवस्मारकाचा प्रश्न मार्गी लावावा’, आ.विनायक मेटेंची मागणी


