🕒 1 min read
हिंगोली : राज्यातील कोरोनामुक्त झालेल्या विभागात पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग सुरळीतपणे सुरु करण्याबाबतचा शासन निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. विद्यार्थांना शाळेतील नियमित शिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरु करण्याची बाब विचाराधीन होती. राज्यातील कोविड- मुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती /स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ठरावांनी कोविड निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळेतली इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास शासन मान्यता शिक्षण विभागाकडून दिली आहे.
दरम्यान, आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू करण्यात येणार असून यासाठी गावाने जबाबदारी स्वीकारावी, अशी माहिती पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज शुक्रवारी हिंगोली येथे दिली. मंत्री गायकवाड हिंगोली जिल्ह्याच्या दोन दिवस दौऱ्यावर आहेत.
सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत
मागील महिनाभरापासून एकही रुग्ण न आढळलेल्या ठिकाणी वर्ग सुरू केले जाणार आहेत. शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करावे विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेच्या परिसरात मनाई करण्यात आली आहे. शाळा सुरू करताना मुलांना टप्याटप्यात शाळेत बोलविण्यात यावे त्यासाठी वर्गांना अदला बदलीच्या दिवशी सकाळी, दुपारी नियोजनानुसार वर्ग सुरू करावे एका बाकावर एकच विद्यार्थी बसवावा. यासह इतर विविध उपायोजना करण्याच्या मार्गदर्शक सुचनाही शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत. ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली जाणार असून ही समिती शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोर्टाला सांगितले ‘मी आजारी आहे’, अन् तिकडे खा. प्रज्ञा ठाकूर लग्नात नाचल्या
- ‘संजय राऊत यांची मतं स्ट्राँग आहेत’, ‘सामना’च्या अग्रलेखावर पंकजा मुंडेंचे भाष्य
- ‘पंकजा मुंडेंना संपूर्ण खतम करण्यासाठीच कराडांना मंत्रिपद’, ‘सामना’तून शिवसेनेचा दावा
- बीड, उस्मानाबादच्या हक्काच्या पाण्यासाठी आ.धस यांनी विधिमंडळात उठवला आवाज
- ‘अजित पवारांनी शिवस्मारकाचा प्रश्न मार्गी लावावा’, आ.विनायक मेटेंची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
