Share

‘पंकजाताई 2024च्या निवडणुकीत मी तुमच्यासोबत’; करुणा मुंडेंचा जाहीर पाठिंबा

Published On: 

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील वाद काही महिन्यांनतर आता पुन्हा उफाळत आहे. करुणा मुंडे यांनी आज फेसबूक लाईव्ह करत परळीत जावून पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं आहे. या पत्रकार परिषदेमध्ये धनंजय मुंडेंवरील सर्व आरोप सिद्ध करणार असल्याचे जाहीर केले आहे. धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविरोधात षडयंत्र रचले असल्याचंही सांगितलं आहे.

‘पंकजा मुंडे यांच्याविरोधात धनंजय मुंडे यांनी अनेक षडयंत्र रचले आहेत. २०२४ च्या निवडणुकीत मी तुम्हाला साथ देणार आहे. तुमच्या पाठिशी उभं राहणार आहे. माझ्या पतीने मला अनेक नेत्यांबद्दल सांगितलं आहे. पण मला त्यांच्यात पडायचं नाही. पंकजा मुंडे या माझ्या नणंद लागतात. घरातल्या आहेत, त्यामुळे त्यांच्याबाबतची ही माहिती मी देऊ शकते’, असं म्हणत करुणा मुंडे यांनी पंकजा मुंडेंना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.

‘स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या फेकलेल्या तुकड्यांवर जगणारी लोकही आज त्यांच्याच मुलींना मागे टाकत आहेत. पंकजा मुंडे यांच्या विरोधात काय षड्यंत्र आखलं जात आहे? हेही मी माध्यमांसमोर मांडणार आहे. माझी आई सांगत होती, एकवेळ कुत्रा पाळ पण धोकेबाज आणि घाणेरडी माणसं पाळू नकोस. मी तिचं ऐकलं नाही म्हणून भोगत आहे, असंही यावेळी करुणा मुंडे म्हणाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!