नवी दिल्ली: येथे एका ९ वर्षाच्या मुलीचा सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर दिल्लीमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सामूहिक बलात्कार आणि हत्येनंतर पीडितेवर आईवडिलांच्या संमतीशिवाय अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकारामुळे अधिकच संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान दिल्लीतील छावणी परिसरात असलेल्या गावात जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज सकाळी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. ‘न्याय मिळेपर्यंत मी तुमच्या सोबत आहे’,अशी ग्वाही त्यांनी पिडीतेच्या कुटुंबाला दिली आहे.
https://twitter.com/RahulGandhi/status/1422779132249788416
दिल्लीतील छावणी परिसरातील नांगलगाव येथे मागास समाजातील एका नऊ वर्षीय मुलीची सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर राजकारणातून संताप व्यक्त केला जात आहे. विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी याविरोधात संताप व्यक्त केला आहे. तर या मुद्यावरून तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत येऊन निवेदन दिले तर मी टक्कल करेल असे म्हटले आहे. त्यामुळे आता या मुद्यावरून विरोधी पक्षाकडून अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना घेरले जात आहे.
दरम्यान राहुल गांधीनंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालदेखील बलात्कारपिडीत कुटुंबाची भेट घेणार आहेत. पिडीतेला न्यायासाठी सर्व ती मदत करणार असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘संसदेत आलात तर, मी टक्कल करेल’; देरेक ओब्रायन यांचे अमित शहांना आव्हान
- टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राची अंतिम फेरीत धडक, पहिल्याच प्रयत्नात यशस्वी
- टीम इंडियात रहाणेविरुद्ध रचला जातोय कट? गावसकरांनी केला आरोप
- लेखापाल मारहाण प्रकरण, शिवसेना खा.भावना गवळी अडचणीत
- काँग्रेसची शिवसेनेवर पुन्हा कुरघोडी; शिवसेनेच्या माजी राज्यमंत्र्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश


