Share

लेखापाल मारहाण प्रकरण, शिवसेना खा.भावना गवळी अडचणीत

Published On: 

वाशिम:  खासदार भावना गवळी यांच्यावर सहकारी कारखाना विक्रीमध्ये कोट्यवधीचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप माजी उपशहर प्रमुख यांनी केला आहे. याच प्रकरणाशी संबंधीत सकारात्मक अहवाल तयार करुन देण्यासाठी सनदी लेखापालांना गुंड सईद खानमार्फत दबाव आणून धमकावत मारहाण केल्याचा प्रकार औरंगाबादेत घडला होता.

मात्र, सनदी लेखापालांनी अहवाल बनविण्यास नकार देत गवळी यांच्यासह धमकाविणा-या गुंडांविरुध्द पोलीस ठाण्यात आणि पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रारी दिल्या. परंतू पोलिसांनी दखल न घेतल्याने अखेर सनदी लेखापालांनी खंडपीठात धाव घेतली होती. त्यावर खंडपीठाने पोलीस आयुक्त आणि मुकुंदवाडी पोलिसांना ३० ऑगस्टपर्यंत शपथपत्रावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.सनदी लेखापाल उपेंद्र मुळे यांचे खासदार गवळी यांच्याशी २००८ पासून व्यवसायिक संबंध होते. दरम्यान, श्री बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड कारखान्याच्या विक्रीत कोट्यावधींचा आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शिवसेनेचे माजी उपशहर प्रमुख हरीश सारडा यांनी याचिका दाखल केली होती. याप्रकरणात स्वीय सहायक अशोक गांडोळे यांनी २५ कोटी रुपयांचा अपहार केल्याचे सांगत खासदार गवळी यांनी बेकायदेशीर आणि अवैध कागदपत्र तयार करण्यासाठी मुळे यांना सप्टेंबर २०१९ मध्ये सांगितले होते. मात्र, मुळे यांनी २५ कोटींची रोकड नेमकी आली कोठून असे सांगून अवैध आणि बेकायदेशीर आॅडीट रिपोर्ट तयार करण्यास नकार दिला होता.

तरीही खासदार गवळी यांनी मुळे यांच्यावर दबाव टाकुन रिपोर्ट बनविण्यास गुंडांमार्फत धमक्या आणि मारहाण केल्याचाही प्रकार घडला होता. त्याविरोधात मुळे यांनी ३१ आॅक्टोबर २०१९ रोजी पोलीस आयुक्त, औरंगाबाद यांच्याकडे खासदार गवळी यांच्यासह सईद खान व अन्य पाच ते सहा जणांविरुध्द तक्रार दिली होती. पण पोलीस तक्रार नोंदवून घेत नसल्याने मुळे यांनी १२ नोव्हेंबर २०२० रोजी खंडपीठात याचिका दाखल केली होती. अखेर २ आॅगस्ट २०२१ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याप्रकरणी सुनावणी झाली. त्यात खंडपीठाचे न्यायमुर्ती व्ही. के. जाधव आणि श्रीकांत कुलकर्णी यांनी मुळे यांच्या तक्रारीवर काय कारवाई केली. असा प्रश्न उपस्थित करत पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता आणि मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या अधिका-यांना शपथपत्राव्दारे ३० आॅगस्टपर्यंत लेखी उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!