मुंबई : आपल्या अजब-गजब वक्तव्यामुळे चर्चेत असलेली बॉलिवूडमधील कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखी सावंत ही पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात गेली असून तिथे तिने खळबळजनक खुलासे केले आहेत. मी सध्या दिवाळखोर झाली असून माझ्याकडे बिलकूल पैसे उरलेले नाहीत, असा दावा राखीने बिग बॉसच्या घरात केला आहे.
‘मी अशिक्षित आहे. त्याचाच फायदा घेत एका ओळखीच्या व्यक्तीने मला फसवून माझी सही घेतली व त्यानंतर त्याने माझी सर्व संपत्ती व पैसे लुबाडले. त्या व्यक्तीने माझ्या सहीचा गैरवापर केला. आता माझ्याकडे काहीच उरलेले नाही. मी कंगाल झाले आहे.
मला लुटणारी व्यक्ती आता या जगात देखील नाही. त्यामुळे मी केस देखील नाही लढू शकत. मी पूर्णपणे हतबल झालेले. माझ्यावर माझी आजारी आई, विधवा बहिण व इतर घरच्यांची जबाबदारी आहे. मी देवाचे आभार मानते की त्यांनी मला बिग बॉसच्या घरात पाठवले. मला या ट्रॉफीसोबत मिळणाऱ्या रकमेची खरच गरज आहे’, असे राखीने घरातील बाकीच्या स्पर्धकांना सांगितले राखीच्या या खळबळजनक वक्तव्यावर सगळेच चकित झाले आहेत. राखी सावंत खरंच कंगाल झाली आहे का? का तिचा हा पब्लिसिटी स्टंट आहे हे बगण्याजोगे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापराचे नियम 1 जानेवारीपासून बदलणार…
- बळीराजावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट, पुढील दोन दिवसांत राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
- शेतकरी आंदोलन : वॉशिंग्टनमध्ये म. गांधींच्या पुतळ्याची विटंबना,खलिस्तानी झेंड्यानं झाकला चेहरा
- पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आपल्या मुलीच्या ‘त्या’ अफवांवरून नाराज
- शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे; राजू शेट्टींचा सरकारला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

