मुंबई : २०१९ च्या विधानसभा निवडणुकांवेळी माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना भाजपकडून तिकीट नाकारण्यात आलं होत. यानंतर सुमारे वर्षभर विनोद तावडे यांना सक्रिय राजकारणातून अलिप्त राहावं लागलं होतं. तर, विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव करत परळी विधानसभेत विजय मिळवला होता. यानंतर राजकीय पुनर्वसनावरून पंकजा मुंडेंनी अनेकदा जाहीर नाराजी व्यक्त करत पक्षाशी विसंगत काही भूमिका देखील केल्या होत्या.
मात्र, काही दिवसांपूर्वी भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित करण्यात आली होती. यावेळी विनोद तावडेंसह पंकजा मुंडेंना मोठी जबाबदारी सोपवत पक्षाने त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी या दोघांची वर्णी लागली आहे. यानिमित्त आज मुंबईमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विनोद तावडेंचा सत्कार करण्यात आला.
सत्कारावेळी विनोद तावडे म्हणाले, ‘ पक्षाने माझ्या हिताचा निर्णय घेतला तर पक्ष चांगला, माझ्या मनाविरुद्ध निर्णय घेतला तर पक्ष वाईट असा समजणार मी नाही. मध देणाऱ्या कमळाच्या पाकळ्यांना भुंगासुद्धा नुकसान करत नाही, आपण तर माणसं आहोत.’ तर, २०१९ मध्ये पक्षाने मला उमेदवारी नाकारली यावेळी इतर पक्षातील मित्रांनी मला चमत्काराशिवाय नमस्कार नाही असा सल्ला दिला. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनीही संपर्क साधला. मात्र माझा मूळ पिंड भाजप, संघ आणि अभाविपचा असल्याने कोणीही मला त्यांच्या पक्षात बोलवण्याची हिम्मत केली नाही असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
महत्वाच्या बातम्या :
- पाणी टंचाई भासू नये यासाठी आगामी काळात आता धनंजय मुंडे यांचे ‘हे’ असणार ध्येय
- निवडणूक आयोगानं शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ नाकारत ‘बिस्किट’ दिलं
- रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा – पडळकर
- भारतात गांजा कायदेशीर झालाच पाहिजे ; अभिनेता रणवीर शौरीचे वादग्रस्त वक्तव्य
- मनोज कोतकर यांच्यावर कारवाईसाठी भाजपला मुहूर्त सापडेना!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

