मुंबई : मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा खासदार शरद पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शुभारंभ झाला.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सणसणीत इशारा दिला आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शनिवारी शिवसेना भवन फोडण्याची धमकी दिली होती. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे व भाजपच्या इतर नेत्यांकडूनही शिवसेना व मुख्यमंत्र्यांवर सातत्याने टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आज चांगलेच भडकले. थप्पड से डर नहीं लगता, असे म्हणत त्यांनी या कार्यक्रमात विरोधकांनाही इशारा दिला.
शिवसेना भवन फोडण्याच्या विधानाचा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. ‘आपलं सरकार ट्रिपल सिट सरकार आहे. मी मुद्दामहून हे बोलत आहे. टीका ऐकायची खूप सवय झाली आहे, आता कौतुक झालं की भीती वाटते. चित्रपटातील डायलॉगप्रमाणे थप्पडसे डर नही लगता साहब, प्यार से लगता है. अशा या थापडा घेतल्या आणि दिल्या आहेत. जितक्या घेतल्या तितक्या दाम दुपटीने दिल्या सुद्धा आहेत. पुढे सुद्धा देऊ, त्यामुळे आम्हाला कोणी थापड देण्याचं बोलू नये. अशी एक थापड देऊ की पुन्हा कधी उठणार नाही. हा शिवसैनिकाच्या रक्तातील गुण आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, भूमिपूजन केले, ३६ महिन्याने आपण सगळे एकत्र चाव्या देऊ. आयुष्य काही-काही क्षण अनपेक्षितपणे येत असतात. मुख्यमंत्रिपद स्वप्नात नव्हते. आता त्याच्या खोलात जात नाही, ते स्वीकारले. लहानपणापासून या परिसरात येणं आहे. शिवसेना प्रमुखांसोबत यायचो. भूमिपूजन मी मुख्यमंत्री असताना होईल, हे स्वप्नात पाहिले नाही. माझ्यावर लोकांनी पुष्पवृष्टी केली. पण आम्ही लोकांच्या ऋणात आहोत. मुंबईने, मराठी माणसाने रक्त सांडलं आहे. स्वतःची हक्काची घरं झाल्यावर मोहाला बळी पडू नका” असा सल्लाही यावेळी ठाकरे यांनी रहिवाशांना दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘३१ जुलैपर्यंत एमपीएससीच्या जागा भरणार होते ना! दादा.. क्या हुआ तेरा वादा?’, चित्राताईंचा अजित पवारांना चिमटा
- नुकसानग्रस्तांसाठी फडणवीसांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, केल्या तब्बल २६ मागण्या
- ‘भविष्यात मोदी कृपेने स्वतःच्या पैशाकडे पाहण्यासाठीही पैसे लागू नयेत म्हणजे मिळवलं!’
- ‘पकडापकडीचा खेळ खेळणारे मोदी सरकारला आव्हान देताहेत’, भाजपचा शरद पवारांना टोला
- मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट, बीडचा फैसल खान अटकेत


