अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- नगर तालुक्यातील अकोळनेर येथे कोजागिरी पाैर्णिमेनिमित्त गावात भजनाचा कार्यक्रम होता. त्यासाठी गावातील वृद्ध मंडळींची संख्या मोठी होती. कोजागिरी पाैर्णिमेनिमित्त भजनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती राहिल्याचा फटका अकोळनेर येथील अनेक लोकांना बसला आहे. गावातील ४४ जणांना एकदम कोरोनाची बाधा झाली असून, अजून काही अहवाल येणे बाकी आहे. या घटनेमुळे नगर तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
अकोळनेर हे गाव नगर शहरापासून जवळच आहे. एका लहान गावात मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने पंचक्रोशितील गावांनीही धास्ती घेतली आहे. कोजागिरी पाैर्णिमेनिमित्त गावात भजनाचा कार्यक्रम होता. त्यासाठी गावातील वृद्ध मंडळींची संख्या मोठी होती. मागील पाच दिवसांत काही लोकांना त्रास जाणवू लागल्याने त्यांची तपासणी करण्यात आली.
त्यातील अनेक जण कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्याने उर्वरित अनेकांची तपासणी करण्यात आली. कोरोनाचा फैलाव झाल्याने ऐन दिवाळीच्या सणाच्या तोंडावर गावातील लोक बाहेर जाणार नाहीत, तसेच बाहेरील लोकांनीही गावात येऊ नये, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
मागील एक महिन्यांपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्येत झपाट्याने घट होत होती. परंतु आता नगर जिल्ह्यात पुन्हा रुग्ण वाढू लागल्याचे दिसून येत आहे. दीपावलीच्या खरेदीनिमित्त लोक बाहेर पडत असून, बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. अनेकजण तोंडाला मास्क लावत नाहीत.
लग्न, साखरपुडा आदी कार्यक्रमातही नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. आता अकोळनेरमध्ये सध्या सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. अजून अनेक लोकांचा अहवाल येणे बाकी असून, गावकऱ्यांना प्रशासनाने योग्य त्या खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- जो बायडेनना शेअर बाजाराची देखील सलामी; मुंबई शेअर बाजारामध्ये सेन्सेक्सचा ऐतिहासिक उच्चांक
- कमला हॅरिस यांचा विजय आणि मल्लिका शेरावतच ११ वर्षांपूर्वीच्या ट्विट होतय व्हायरल…
- ‘उद्धव ठाकरे यांचे ‘ते’ विधान म्हणजे शिखंडीच्या आड दडून टीका करण्यासारखे आहे’
- हिटमॅन रोहित शर्माच्या फॅन्ससाठी महत्वाची बातमी!, बीसीसीआयने घेतला ‘हा’ निर्णय
- बिहार निवडणुकीवर राऊतांची प्रतिक्रिया, बादशाह तो वक्त होता है….. इन्सान तो युं ही गुरूर करता है!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

