परभणी : जिल्हा शासकीय रुग्णालयात सात जणांची हायड्रोसील शस्त्रक्रिया बुधवारी करण्यात आली. जिल्हा रुग्णालय व हिवताप कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हायड्रोसील मुक्त महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत जिल्ह्यात आढळून आलेले हायड्रोसीलग्रस्त 36 पैकी 16 जणांना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची शारीरिक तपासणी करण्यात आली. त्या सर्वांची आरोग्य तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यापैकी सात जणांची बुधवारी अंडवृद्धी शस्त्रक्रिया (हायड्रोसील) पूर्ण करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रकाश डाके यांनी दिली.
हे शस्त्रक्रिया शिबीर यशस्वी करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील भूलतज्ज्ञ डॉ. दुर्गादास पांडे, डॉ, बालाजी मुंडे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. बी. टी. धुतमल यांच्या सहकार्याने सर्जन डॉ. अशोक बन, डॉ. शाहबाज देशमुख यांनी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या. त्यांना अधिसेविका मीना देशमुख, श्रीमती फारकी, जयश्री वाणी आदींनी सहकार्य केले. तसेच शरद कदम, माणिक कासापुरीकर, जाफर पटेल, एस.एम. चाटे, मुकादम यांनीही यासाठी परिश्रम घेतले.
दरम्यान, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. व्ही.आर. पाटील यांनी हायड्रोसील मुक्त महाराष्ट्र या मोहीमेअंतर्गत शोध मोहीमेत कार्यरत हिवताप कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह शासकीय रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले. हायड्रोसील मुक्त महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत योजनेच्या लाभासाठी जिल्हा हिवताप कार्यालयाशी संपर्क साधावा, पात्र लाभार्थींच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतील, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. व्ही.आर. पाटील यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- रिहानाविरुद्ध आता बॉलीवूडचा खिलाडी, सिंघम मैदानात, गैरसमज पसरवणाऱ्यांनाही सुनावले खडे बोल
- रिहानाच्या ट्विटवर राहुल गांधींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, दिल्लीतील फौजफाट्यावरून मोदींवर टीका
- प्यायचे होते पाणी, पण चुकून प्यायले सॅनिटायझर; BMCचे सहआयुक्त रमेश पवारांकडून घडली चूक
-
शेतीतलं ना राहुल गांधींना काही कळतं, ना रिहानाला – संबित पात्रा
- शरजील उस्मानीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी चंद्रकांत पाटलांचे थेट योगींना पत्र

