Share

सामन्याला कलाटणी देणारे षटक; एक धाव देत ३ गडी बाद; शाहबाज अहमदची कमाल

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : बुधवारीझालेल्या अटीतटीच्या सामन्यात विराट कोहलीच्या बेंगलुरु रॉयल चॅलेंजर्स संघाने हैदराबाद सनरायझर्स संघाचा ६ धावांनी पराभव केला आहे. स्पर्धेतील आरसीबीचा हा सलग दुसरा विजय आहे तर हैदराबादच्या संघाचा सलग दुसरा पराभव आहे. धडाकेबाज अर्धशतक करणाऱ्या आरसीबी संघाच्या ग्लेन मॅक्सवेलला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

हा सामना जवळपास हैदराबादचा संघ सहज जिकंणार असे वाटत असताना आरसीबीच्या शाहबाझ अहमदने टाकलेल्या १७व्या षटकात सामन्याला कलाटणी मिळाली आणि सामना आरसीबीच्या बाजुने फिरला. या षटकात शाहबाज अहमदने केवळ एक धाव दिली आणि हैदराबाद संघाचे तीन फलंदाज बाद केले. पहिल्या चेंडुवर धोकादायक जॉनी बेअरस्टोला बाद केले. तर दुसऱ्या चेंडुवर खेळपट्टीवर स्थिरावलेल्या मनिष पांडेला बाद केले. तर यात षटकात आखेरच्या चेंडुवर अब्दुल समदला बाद केले आणि सामन्याला कलाटणी मिळाली.

टी-२० सामन्यात शेवटची काही षटके फार महत्वाची असतात, त्यामुळे त्या षटकात होणाऱ्या गोलंदाजीवर सामन्याचा निर्णय अवलंबुन असतो. आरसीबीने युवा गोलंदाज शाहबाज एहमदला १७ षटकाची जबाबदारी दिली आणि शाहबाजने उत्तम कामगीरी करत सामना फिरवला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!