🕒 1 min read
सिल्लोड : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गतवर्षी पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेऊन हाहाकार माजविला होता. शहरात एक हजारहून अधिक भटकी कुत्री आहेत. आता या भटक्या कुत्र्यांना विलक्षण त्वचारोगाने ग्रासले आहे. सर्वच कुत्री दिवसभर अंग खाजवत असल्याचे दृष्टिस पडते. त्यांच्या अंगावरील केस झडून पडल्याने , त्वचा उघडी व जखमा झाल्याने किळसवाने दृष्य बघणे रहिवाशांना असह्य होत आहे. त्यापासुन माणसांनाही खरूजेचा संसर्ग होत असल्याने याकडे स्थानिक प्रशासन व पशुवैद्यक विभागाने लक्ष घालायची गरज आहे.
2002 साली सिल्लोड नगरपरिषदेणे कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी औरंगाबादप्रमाणे निर्बिजिकरण प्रोग्राम राबवावा अशी मागणी समाजातुन होत आहे. खाजेमुळे कुत्री बेचैन होतात, चिडतात व जवळून जाणाऱ्या व्यक्तींना चावण्याची अधिक शक्यता असते. भटक्या खरुजलेल्या कुत्र्यांवर उपाय योजना करणे हे स्थानिक नगरपरिषद प्रशासन व पशुवैद्यक विभागाचे काम आहे.
कुत्र्यांना झालेला हा त्वचारोग कॅनाइन मेंज नावाचा संसर्गजन्य विकार असून याचे २ प्रकार आहेत. डेमॉडेक्स किड्यांमुळे डेमोडीकॉसिस नावाचा व सार्को प्टीस किड्यांमुळे खरूज नामक त्वचारोग कुत्र्यांना होतो. प्रचंड खाज येऊन त्यांच्या अंगावरील केस यामुळे गळुन पडतात व तो भाग लालसर व जखम सदृष्य दिसतो. खरूज तथा मेंजग्रस्त प्राण्यांचा जवळचा व वारंवार संपर्क नको. तसेच दमा असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी अशी माहिती अभिनव प्रतिष्ठानच्या डॉ. संतोष पाटील यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- ‘पवारांचा जन्मच पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहण्यात जाणार ही मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेघ’
- ‘देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली आहे’
- मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेल्या वचनाच्या वादात नेमकं खोटं कोण बोलत आहे ?
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’
- शरद पवारांनी कृषी कायद्यांच्या सुधारणेला कधीच विरोध केला नाही – नरेंद्र मोदी


