परभणी : परभणीत मॉर्निंग वॉकला गेलेल्या ४ जणांना अज्ञात वाहनानं चिरडलं. यामध्ये २ जणांचा मृत्यू झाला असून दोघं जण गंभीर जखमी झाले आहेत. मानवत तालुक्यातील केकरजवळा येथील ही घटना असून चौघांना चिरडून वाहन चालक फरार झाल्याची माहिती मिळतेय.
मृतांमध्ये केकरजवळा गावच्या पोलीस पाटलांचाही समावेश आहे. पोलीस पाटील उत्तम लाडाने, आत्मराम लाडाने यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. तर नंदकिशोर लाडाने, राधेश्याम लाडाने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पाथरी-पोखरणी रस्त्यावर परभणीकडून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने मानवत तालुक्यातील केकरजवळा चार जणांना उडवले. चार ही जण गावातून राष्ट्रीय महामार्ग २२२ वर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. उत्तमराव नामदेव लाडाने (५२, पोलीस पाटील केकरजवळा), आत्माराम भीमराव लाडाने (४२) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर नंदकिशोर साहेबराव लाडाने (५०), राधेश्याम रामभाऊ लाडाने ( ४८ ) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना परभणी येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- तीन आयपीएल संघांना मोठा धक्का; बड्या खेळाडूंची माघार
- आता कुठल्याही परिस्थितीत निवडणुका घ्याव्याच लागतील; सदावर्ते यांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल
- ‘शिवसेनेतील नेत्यांकडूनच मुख्यमंत्री ठाकरेंची दिशाभूल’, मुनगंटीवार यांची टीका
- खाद्यतेलावरील आयात शुल्कात कपात, हा शेतकऱ्यांना आणखी एक धक्का – तुपकर
- ओबीसी समाजाला धक्का : राज्य सरकारला निवडणुका पुढे ढकलता येणार नाही – सर्वोच्च न्यायालय

