🕒 1 min read
नागपूर : परप्रांतिय ओबीसींचीही राज्यात ओबीसींमध्ये आरक्षण देण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. या मागणीचे कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्वागत केले आहे. परप्रांतीय ओबीसींना आरक्षण देण्याचा प्रस्ताव तयार करणार असून तो केंद्राकडे पाठवण्यात येईल असे वडेट्टीवार म्हणालेत. काँग्रेस नेते नसीम खान यांनी परप्रांतीय ओबीसींचा मुद्दा उपस्थित केला आहे.
यावर प्रतिक्रिया देताना मंत्री वडेट्टीवार म्हणाले की, नसीम खान यांनी प्रस्ताव दिला आहे. मुंबईत मोठ्या संख्येने उत्तर भारतीय ओबीसी समाज आहे. महाराष्ट्रातील ओबीसी आणि उत्तर भारतीय ओबीसीत समानता आहे. ही संख्या फार नाही. १९०० पूर्वीचा दाखला मिळत असेल आणि १९६७ पूर्वी जन्मलेल्यांची शिफारस करुन त्यांना ओबीसीत घेता येईल का? असा प्रस्ताव आयोगाकडे पाठवू. आयोगाने अभ्यास करुन प्रस्ताव दिल्यानंतर निर्णय घेऊ. याबाबत सर्व माहिती आल्यानंतर निर्णय घेऊ. महाराष्ट्रात जन्मले असेल आणि त्यांचे पूर्वज ओबीसी असेल तर त्यांना नाकारणे कितपत योग्य आहे? याचाही अभ्यास करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारची मागणी केली आहे. हे फक्त राजकारण आहे असं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. तर यातून काही साध्य होणार नाही, महाराष्ट्रातील लोकांना असं उत्तर प्रदेशात काही आरक्षण मिळत नाही. परप्रांतियांना आरक्षण अशक्य, अशी मागणी करणारे आणि त्यावर प्रस्ताव देणारे मूर्ख असल्याचं म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यावरून सरकारवर टीका केली.
महत्वाच्या बातम्या
- चंद्रकांत पाटलांच्या नावाने वनविभागाची २०० कोटींची जमीन हडपण्याचा प्रयत्न
- आरोपीच्या सांगण्यावरून पीडितेला मदत न मिळू देणे, हेच का साहेबांचे महिला धोरण ?
- मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाच अनेक सरकारी मालमत्ता भाडेतत्वावर दिल्या होत्या – भाजप
- हरवलेली ‘ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती‘ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा – पडळकर
- एकनाथ खडसेंविरोधात ED चे एक हजार पानी आरोपपत्र दाखल, पत्नी आणि जावयाचाही समावेश


