पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या नावाने असलेली वनखात्याची तब्बल १८ एकर जमीन बळकावण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. महसूल विभागाच्या सतर्कतेमुळे हा सर्व प्रकार वेळीच लक्षात आला. मात्र, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे चंद्रकांत पाटील अडचणीत येण्याची शक्यता होती.
हडपसर वनविभागाच्या मालकिची १८ एकर जमीन आहे. वनविभागाची ही जमीन बळकवण्यासाठी फडणवीस सरकारच्या काळात महसूल मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांची बनावट स्वाक्षरी असलेल्या आदेशपत्राचा वापर करण्यात आला होता. हे आदेशपत्र देऊन जमीन बळकावणाऱ्या व्यक्तीने प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण महसूल विभागाने वेळीच ही बाब लक्षात घेतली आणि महसूल विभागाने संबंधित व्यक्तीविरोधात पोलिसांत तक्रारही दिली.
संबंधित व्यक्तीने जमिनीच्या सातबाऱ्यावर स्वत:चे नाव लिहून ही जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला होता. सध्याच्या बाजारभावानुसार हडपसरमधील वनविभागाच्या या जमिनीची तब्बल २०० कोटी रुपये किंमत आहे. महसूल विभागाच्या सतर्कतेमुळे हे संकट टळलं असून चंद्रकांत पाटलांची ही अडचण आता दूर झाली आहे. आता पोलीस प्रशासन याबाबत काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात भाजपला एका हाती सत्ता मिळणार; चंद्रकांत पाटलांना वाटतोय विश्वास
- इंधन दर कमी करण्याची किल्ली अजित पवारांकडेच आहे – चंद्रकांत पाटील
- ‘गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत’ ; उपमुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
- हरवलेली ‘ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती‘ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा – पडळकर
- एकनाथ खडसेंविरोधात ED चे एक हजार पानी आरोपपत्र दाखल, पत्नी आणि जावयाचाही समावेश

