पुणे – एका प्रसिद्ध कॅसेट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केल्याची बातमी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. यातच आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे याच प्रकरणाशी संबंधित एका कथित ऑडिओ क्लिपमुळेअडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचे कारण म्हणजे पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देतानाची कथित ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे.
२०१७ ते २०२० दरम्यान भूषण कुमार यांनी अत्याचार केल्याचा सदर महिलेचा आरोप आहे. या महिलेच्या म्हणण्यानुसार भूषण यांनी आपल्याला एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम देण्याच्या बहाण्याने वेगवेळ्या ठिकाणी बोलावून बलात्कार केला. या गुन्ह्यात भूषण यांच्यावर ३७६, ४२०, ५०६ या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल असल्याचा दावा देखील पिडीत महिलेने केला आहे.
दरम्यान, आता या पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या मलिकार्जुन पुजारी या सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देतानाची जितेंद्र आव्हाड यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ही ॲाडिओ क्लिप एका ट्विटर युजरने ट्विटरवर अपलोड केली आहे. ( या ॲाडिओ क्लिपच्या सत्यतेची आम्ही पुष्टी करत नाही ).
THE BIGGEST EXCLUSIVE !!!!
MVA Minister @Awhadspeaks asking a person named Pujari to not help a girl who has accused T-Seriers Honcho Bhushan Kumar.
Let the Girl commit suicide Bhushan has asked help from @PawarSpeaks & @praful_patel.
Another Sushant Type Suicide/Murder ?? pic.twitter.com/urLxqXg1Du
— Sameet Thakkar (Modi Ka Parivar) (@thakkar_sameet) September 3, 2021
दरम्यान, याच मुद्द्यावरून आता भाजपने आव्हाड यांना लक्ष्य केले आहे. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांनी आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. गावडे म्हणाले, जितेंद्र आव्हाडांना सत्तेचा प्रमाणाबाहेर माज आलेला आहे. करमुसे मारहाण प्रकारणात राज्य सरकारने त्यांना पूर्णपणे पाठीशी घातल्याने त्याचा असा समज झाला आहे की त्यांचे कोणीच काही करू शकत नाही.
या ऑडीओ क्लिप वरून असे दिसत आहे की या प्रकरणातील बलात्काराचा आरोपी जेष्ठ नेते शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांना भेटला, मग पवारांच्या आणि पटेलांच्या सांगण्यावरून आव्हाड यांनी पुजारी यांना फोन करून पीडितेला मदत करू नको असे सांगितले, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे राज्यातील जेष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून राज्याचे मंत्री जर बलात्काराच्या आरोपींना पाठीशी घालणार असतील तर राज्य राज्यातील बलात्कार पीडित महिलांनी न्यायाची अपेक्षा कोणाकडून ठेवायची ? असा सवाल गावडे यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- चंद्रकांत पाटलांच्या नावाने वनविभागाची २०० कोटींची जमीन हडपण्याचा प्रयत्न
- इंधन दर कमी करण्याची किल्ली अजित पवारांकडेच आहे – चंद्रकांत पाटील
- ‘गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत’ ; उपमुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
- हरवलेली ‘ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती‘ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा – पडळकर
- एकनाथ खडसेंविरोधात ED चे एक हजार पानी आरोपपत्र दाखल, पत्नी आणि जावयाचाही समावेश

