🕒 1 min read
मुंबई – डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना काँग्रेसच्या काळातच दिल्ली, मुंबई विमानतळांसारख्या अनेक सरकारी मालमत्ता भाडेतत्वावर दिल्या होत्या. त्यावेळी पी. चिदंबरम हे केंद्रीय अर्थमंत्री होते. आता हेच चिदंबरम मोदी सरकारच्या सरकारी मालमत्ता, प्रकल्प भाडेतत्वावर देण्याच्या निर्णयास विरोध करत आहेत. काँग्रेस आणि चिदंबरम यांचा ढोंगीपणाच यातून दिसतो आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे आ. अतुल भातखळकर यांनी केली आहे.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ. भातखळकर म्हणाले की, सरकारी मालमत्ता, प्रकल्प, उद्योग भाडेतत्वावर देण्याची सुरुवात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर असतानाच झाली होती. त्यावेळी दिल्ली, मुंबई सारखे विमानतळ भाड्याने दिले होते. मोदी सरकारने अशाच पद्धतीने सरकारी मालमत्ता भाडेतत्वाने दिल्या असताना त्याला चिदंबरम विरोध करत आहेत.
यातून चिदंबरम यांचा ढोंगीपणाच दिसून येतो. या मुद्द्यावरून मोदी सरकारला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि चिदंबरम यांची स्थिती ‘ सौ चुहे खा के बिल्ली चली हज को ‘ अशी झाली आहे. काँग्रेसचा सहभाग असलेल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने गेल्याच वर्षी मुंबई – पुणे एक्स्प्रेस वे ही ८ हजार कोटी रु. ना भाडेतत्वावर दिल्याचेही आ. भातखळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
महत्वाच्या बातम्या
- चंद्रकांत पाटलांच्या नावाने वनविभागाची २०० कोटींची जमीन हडपण्याचा प्रयत्न
- आरोपीच्या सांगण्यावरून पीडितेला मदत न मिळू देणे, हेच का साहेबांचे महिला धोरण ?
- ‘सत्तेत हिस्सा मिळाला त्याचा उपभोग घ्या, भलतेसलते विधान करून वाद निर्माण करू नका’
- हरवलेली ‘ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती‘ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा – पडळकर
- एकनाथ खडसेंविरोधात ED चे एक हजार पानी आरोपपत्र दाखल, पत्नी आणि जावयाचाही समावेश


