नागपूर :देशात नव्या कृषी कायद्यांवरून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असल्याने ऐन थंडीत वातावरण तापलं आहे. गेल्या महिन्या भरापासून दिवस दिल्लीतील सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे.
यावरून गेल्या महिना भरापासून राजकारण देखील तापले आहे. तर वेळोवेळी सरकार आणि शेतकऱ्यांमधील चर्चा निष्फळ होत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी देखील विविध शेतकरी संघटनांच्या नेतृत्वात दिल्ली सीमेकडे कूच करत आहेत.
यावर आता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शेती क्षेत्रामध्ये देशाने किती योगदान दिलं आहे. असा सवाल उपस्थित केला आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ६६ व्या राष्ट्रीय अधिवेशना मध्ये बोलत होते.
गडकरी म्हणाले, शेती उत्पादनांची किंमत कमी आणि त्या पासून निर्माण केलेल्या उत्पादनांना जास्त किंमत मिळते. शेतकरी निर्माण करत असलेल्या वस्तूंना किंमत नाहीय. तर बियाणे आणि खते देखील महाग होत आहेत. आज ही स्थिती का झाली आहे ? असा सवाल उपस्थित करत त्यांनी शेती व्यवसायाची अवस्था बिकट असल्याची कबुली दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ज्या ज्या वेळी काँग्रेस सत्तेत येते त्यावेळी धर्मांतरण वाढते : आचार्य तुषार भोसले
- मध्य प्रदेशात लव्ह जिहाद विधेयकाला मंत्रिमंडळात मंजुरी
- इच्छा असेल तर EWS चे आरक्षण घ्या, कुणावरही जबरदस्ती नाही- विजय वडेट्टीवार
- हिंदूत्ववादाचा विसर पडून सत्तेतील शिवसेना आता अजान प्रेमात पडली : शेलार
- अखेर मनसे पुढे अॅमेझॉन झुकलं; मराठीचा भाषेचा लवकरच देणार पर्याय!


