Share

एसटी कर्मचाऱ्यांचे अजून किती बळी सरकारला हवेत? भाजपचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा प्रश्न आता गंभीर बनू लागला आहे. न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिलेले असताना दुसरीकडे राज्य सरकारकडून ३५० कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच, राज्य सरकारने त्यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल केली आहे. आता यावरच भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर टीका करत संतप्त सवाल केला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरु आहे. कर्मचाऱ्यांचे अजून किती बळी सरकारला हवेत? असा संतप सवाल प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारला केला आहे. आत्तापर्य़ंत 372 कर्मचाऱ्यांना निलंबित केले. तसेच 39 कर्मचारी आपल्या प्राणाला मुकले आहेत. असा संताप भाजपने व्यक्त केला आहे.

दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक सूचक ट्विट केले असून त्यामध्ये ‘जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही’, असे ते म्हणाले आहेत. तसेच काल रात्री एसटी कर्मचाऱ्यांसमवेत जेवण करुन आझाद मैदानावरच मुक्काम केला असल्याचीही माहिती यावेळी पडळकरांनी दिली. या ट्विट सोबतच #लढा_विलिनीकरणाचा या हॅशटॅगचा वापर त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!