Share

“शेतीला दिवसा वीज द्या अन्यथा घोटाळे बाहेर काढू” – राजू शेट्टी आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

सातारा : शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याआधी जनआंदोलन उभे केले होते. ‘महावितरणमध्ये वीज वितरण करताना वर्षाला 25 ते 30 हजार कोटींचा घोटाळा होत आहे, हा सर्व घोटाळा बाहेर काढणार आहे’. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.

तसेच राजू शेट्टी म्हणाले, ‘येणाऱ्या 15 दिवसात महावितरणने योग्य निर्णय घेऊन दिवसा शेतकऱ्यांसाठी वीज उपलब्ध न केल्यास संपूर्ण राज्यात जाऊन व्यापक जनआंदोलन उभे करून या सरकारला गुडघे टेकायला लावणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे’. यावेळी महावितरण सोबत शेतकऱ्याला दिवसा वीज उपलब्ध व्हावी यासाठी बैठक घेतली असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत सांगितले.

यासह शेतकऱ्यांच्या वीजेचा एका युनिटचा खर्च 3 रुपयाच्यावर जातो. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरानं वीज देतो असं सांगितलं जाते. म्हणजे 1 रुपये 68 पैशानं वीज घेता. शेतकऱ्यांना 3 रुपयांना वीज देता. आणि त्याचा अधिभार उद्योगांवर टाकता हा ढोंगीपणा आहे, असं राजू शेट्टी म्हणाले. खासगी जलविद्युत प्रकल्पात तयार झालेली वीज 21 रुपये यूनिटनं खरेदी करायची. हा जवळपास 20 ते 25 हजार कोटींचा घोटाळा जर शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली नाही तर बाहेर काढू, असा तडख इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!