Share

“बावनकुळे यांना उमेदवारी नाकारून भाजपने OBC…”, संजय राऊतांचा टोला

Published On: 

मुंबई: भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) हे ओबीसींचे स्वयंभू नेते बनू पाहत आहेत. सरकारने ओबीसी समाजाचा घात केल्याचा भोंगा ते वाजवत आहेत. पण याच बावनकुळयांचा घात त्यांच्याच भाजपने केला. कॅबिनेट मंत्री असतानाही विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आली व कोपऱ्यात उभे केले. तेव्हा हा भोगा शांत होता. बावनकुळे यांच्यासारख्यांना उमेदवारी नाकारून भाजपने ओबीसीचा असा काय मोठा सन्मान केला? असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून लगावला आहे.

ओबीसी आरक्षणाशिवाय महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका घ्या व त्याबाबत दोन आठवड्यांत अधिसूचना काढा. असे आदेश सुप्रीम कोटनि निवडणूक आयोगास दिले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे ओबीसींना पाठबळ देण्याच्या सरकारच्या भूमिकेस खो बसला आहे व त्याबद्दल राज्यातील कर्मदरिद्री विरोधी पक्ष खूश झाला आहे. या प्रकरणांत सरकारची कोंडी झाली याचा विरोधकांना आनंद होणे समजू शकतो, पण ओबीसींचे नुकसान झाल्याची खंत त्यांच्या वागण्या-बोलण्यातून दिसत नाही. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

मध्य प्रदेशसारख्या राज्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळत आहे मग महाराष्ट्राला का नाही? की राज्यात भाजपचे शासन नाही याचा सूड मिळेल त्या मार्गाने घ्यायचा! चंद्रकांतदादा पाटलांसारखे पुढारी आजही सांगतात राज्य भाजपच्या हातात आले तर 24 तासांत ओबीसींना आरक्षण मिळवून देऊ. हे कशाच्या आधारावर? हे खरे असेल तर सरकारने पाटलांच्याच अंगावर काळा डगला चढवून त्यांना राज्याचे वकील म्हणून उभे करायला हरकत नाही. प्रश्न श्रेयाचा नसून ओबीसींना न्याय देण्याचा आहे. नुसत्या तोंडपाटीलक्या नकोत, करून दाखवा! असे आव्हानही संजय राऊत यांनी भाजपला दिले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!