मुंबई : राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना वाढतच असल्याचे पाहायला मिळत आहे. अमानुषपणे महिलांवर अत्याचार केले जात आहेत. राज्यात कायद्याचा कसलाच धाक राहिला नसल्याने आरोपींना बळ मिळत आहे. मुंबईमध्ये साकीनाका, पुण्यातील घटना, अमरावती अशा एक ना अनेक ठिकाणच्या घटना रोज कानी पडत असतानाच आता डोंबिवली, कल्याणमध्ये अशाच घटना घडल्या आहेत. यावरुन राजकीय नेते सत्ताधारी महाविकास आघाडीला धारेवर धरत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले आहेत.
महाबळेश्वरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवसेना नेत्याच्या दोन मुलांसह ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महीला सुरक्षित कशा असतील जेव्हा, रक्षकच भक्षक झाले आहेत…, असं म्हणत भातखळकरांनी शिवसेनेवर शरसंधान साधलं आहे.
महाबळेश्वरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवसेना नेत्याच्या दोन मुलांसह ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महीला सुरक्षित कशा असतील जेव्हा, रक्षकच भक्षक झाले आहेत… pic.twitter.com/V4KFFqNGaT— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 24, 2021
मुंबईतील साकीनाका बलात्काराच्या घटनेने देश हादरला असताना पुन्हा एकदा डोंबिवलीत सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. या सर्व घटना घडत असताना महाबळेश्वरमधील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना समोर आल्याने महाराष्ट्र हा महिलांसाठी असुरक्षित असल्याचं स्पष्ट दिसत आहे. सत्ताधारी विरोधक एकमेकांवर टीका-टिपण्णी करुन या मुद्द्याचं राजकारण करत असतात आरोपी मात्र या सगळ्यातून निर्दोष मुक्त होतात.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात घटना घडल्यावर अन्य राज्यांकडे बोट दाखविणे, ही असंवेदनशीलता : देवेंद्र फडणवीस
- कमालच ! सिंधुदुर्ग विमानतळ सुरु होण्याआधीच ‘या’ तारखेपर्यंतच तिकीट फुल्ल
- ‘त्या’ रस्त्यावर १७० किमी स्पीडच्या गाडीत बसलो होतो पण पोटातलं पाणीसुद्धा हललं नाही – गडकरी
- ‘काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा आणि निष्ठा असणारे नेतृत्व गमावले’
- खामोश.. म्हणणाऱ्या ‘शत्रुघ्न’ यांना आज ही आठवतेय लग्नाची अनोखी कहानी


