औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्यामुळे अनेक व्यवसायांवर त्याचा परिणाम बघायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात पर्यटकांची संख्या घटली आहे. याचा परिणाम हॉटेल व्यवसायांवर होताना दिसतोय.
औरंगाबाद जिल्हा हॉटेल रेस्टोरंट मालक संघटनेने दिलेल्या माहितीनुसार शहरात लहानमोठे एकूण ४०० हॉटेल्स आहेत. त्यात १२ ते १५ हजार खोल्या आहेत. पण आज त्यातील ८० टक्के खोल्या रिकाम्या आहेत. कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने त्याचा फटका पर्यटन उद्योगाला बसतोय आणि पर्यायाने तो हॉटेल व्यवसायावर होत आहे. कदाचित औरंगाबाद शहर पुन्हा लॉकडाऊन झाले तर अशी भीती पर्यटकांना आहे. त्यामुळे ते शहरात येण्यास घाबरत आहेत. जर पर्यटनासाठी गेलो तर तिथेच अडकून पडलो तर पुढं कसे होणार या काळजीने लोक घराबाहेर पडत नाहीयेत.
गेल्या वर्षी अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात हॉटेल व्यवसाय सुरू झाले होते. तसेच यंदाच्या जानेवारी महिन्यापर्यंत हॉटेलची बुकिंगही चांगलीच झाली होती. दरम्यान, गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीत कोरोनाचा प्रभाव पुन्हा जाणवू लागला. त्यामुळे गतवर्षी प्रमाणे हॉटेल व्यवसाय ठप्प होतो की काय अशी भीती व्यावसायिकांना वाटत आहे.
दरवर्षी शासनाला हॉटेल व्यावसायिकांकडून जवळपास ५०० कोटींची महसूल मिळतो. गेल्यावर्षी तो न मिळाल्याने कोरोनामुळे सरकारचेही यात नुकसान झाले आहे. तसेच व्यवसाय बंद, उत्पन्न तर नाहीच शिवाय कर्मचाऱ्यांचे वेतन, मेन्टेनेन्सचा खर्च, विविध कर इत्यादी गोष्टी पाहता व्यावसायिकांचे पाय अजूनही खोलातच आहेत. आता ते बाहेर निघण्याची आशा होती. मात्र, कोरोना रुग्ण नव्याने वाढत असल्याने त्यावरही पाणी फिरते की काय अशी परिस्थिती आहे.
महत्वाच्या बातम्या
- संजय राठोडांचा राजीनामा गेला कुठे ? राष्ट्रवादीने दाखवलं CMO कडे बोट !
- ‘उद्या माझ्या जीवाचे बरेवाईट झाल्यास पूजाच्या न्यायासाठी आवाज उठवा
- घोटाळा झाला आहे, अधिकाऱ्यांचे निलंबन ; धनंजय मुंडेंची मोठी घोषणा
- मनोहरे म्हणाले, ‘ऑडिट करणार’, पांडेय म्हणाले ‘ये तो हो चुका!’
- महिला न्यायाधीशाला मध्यरात्री वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे वकिलाला पडले महागात; थेट तुरुंगात झाली रवानगी


