Share

मनोहरे म्हणाले, ‘ऑडिट करणार’, पांडेय म्हणाले ‘ये तो हो चुका!’

Published On: 

औरंगाबाद : नगर विकास विभागाने १ फेब्रुवारी रोजी स्मार्ट सिटीच्या सीईओ पदावर बाबासाहेब मनोहरे यांची नियुक्ती केली होती. त्यानुसार त्यांनी २२ फेब्रुवारी रोजी स्मार्ट सिटी सीईओ पदाचा कार्यभार स्विकारुन कामकाजास सुरुवात केली. त्यावेळी महालेखाकार कार्यालयाने ऑडिट करावे, अशी मागणी त्यांनी केली होती.

मात्र ही मागणी आपण आधीच केली असून नागपूरहून याबाबत तुम्ही तुमचे ऑडिट करा, असे आदेश आल्याचे आयुक्त पांडेय यांनी काल स्पष्ट केले. आता तर काय म्हणे पुन्हा याच पदासाठी जाहिरात काढण्यात आली आहे. यानिमित्ताने मनोहरे आणि पांडेय यांच्यातील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

मनोहरे यांनी सीईओपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर स्मार्ट सिटीच्या आजपर्यंतच्या कामांचे नागपूर येथील महालेखाकार कार्यालयाने ऑडिट करावे, अशी मागणी त्यांनी केली होती. यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी पत्रकारांसमोर स्पष्ट केले होते. मात्र स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनने मागील काही वर्षात केलेल्या कामांचे ऑडिट करण्यासंदर्भात आपण पूर्वीच नागपूरच्या महालेखाकार (एजी ऑफिस) कार्यालयाला पत्र पाठवले असून अंतर्गत ऑडिट पूर्ण झाले आहे तुम्ही तुमचे ऑडिट करा, असे आदेश आल्याचे काल पांडेय यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले.

ऑडिटसंदर्भात पांडेय आणि मनोहरे यांच्यातील नाराजी आणि समन्वयाचा अभाव साफ दिसून आला. त्यातच सुपर संभाजीनगरचे बोर्ड लावण्यास दिलेल्या परवानगीची देखील चौकशी करणार असल्याचे मनोहरे यांनी जाहीर केले होते. हे प्रकरण ताजे असतानाच आता स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सीईओपदासाठी जाहिरात प्रसिध्द केलेली आहे.

८ मार्च २०२१ पर्यंत सीईओपदासाठी अर्ज मागवले असून या जाहिरातीबद्दल आयुक्त पांडेय यांना मंगळवारी पत्रकारांनी विचारणा केली. तेव्हा त्यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या नगरविकास विभागाची परवानगी घेऊनच ही जाहिरात काढली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!