Share

होंडाची ‘ही’ नवीन बाईक स्मार्टफोनसोबत कनेक्ट करता येणार

Published On: 

मुंबई : वाहन निर्मिती क्षेत्रात दररोज नवनवीन तंत्रज्ञान येत असतात. अद्यायावत तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या या वाहनांमध्ये जपानी वाहन निर्माती कंपनी होंडा देखील आघाडी वर असते. नुकतच होंडाची H’ness CB350 बाईक लाँच झाली होती. ही बाईक भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

अशातच आता कंपनीने नवी स्क्रॅम्ब्लर बाईक भारतात लाँच केली आहे. या गाडीची किंमत 1.96 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी होती. यामध्ये कंपनीने 348.6cc क्षमतेचं सिंगल सिलिंडर युक्त एयर कूल्ड इंजन दिलं आहे, हे 5 स्पीड गियरबॉक्ससह सादर करण्यात आलं आहे. तसेच हे इंजिन 20.78bhp दमदार पॉवर आणि 30Nm टॉर्क जेनरेट करु शकतं. तसेच या बाईकमध्ये स्लिपर क्लचही देण्यात आलं आहे जे गियर शिफ्टिंग अजूनच स्मूथ बनवेल. फ्रंटला 310mm डिस्क आणि मागच्या बाजूला 240mm डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. CB350 RS मध्ये डुअल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिमचा (ABS) वापर करण्यात आला आहे. तसेच डुप्लेक्स क्रॅडल चेसिसवर तयार करण्यात आलं आहे. या बाईकच्या फ्रंटला तुम्हाला टेलेस्कोपिक फॉर्क सस्पेंशन आणि बॅक साईडला हायड्रॉलिक सस्पेंशन मिळेल.

नवीन Honda CB350 RS मध्ये कंपनीने रुंद टायर वापरले आहेत, जे रायडिंग अजूनच कम्फर्टेबल आणि बॅलेन्स्ड बनवतात. सोबतच या बाईकमध्ये राऊंड शेप हेडलँप, ब्लॅक ऑऊट शॉक अॅब्जॉर्बर क्रोम मफलर, डुअल टोन फ्यूल टँक आणि सिंगल पीस सीटसह नवे ग्राफिक्स मिळतील. या बाईकमध्ये तुम्हाला सिंगल पॉड इंस्ट्रूमेंट कंसोलसह अॅनालॉग आणि छोटा डिजिटल डिस्प्लेदेखील मिळेल. या कंसोलमध्ये तुम्हाला ABS, साईड स्टँड इंडिकेटर, इको इंडिकेटर, रियल टाईम मायलेज, अॅवरेज मायलेज, स्मार्टफोन वॉईस कंट्रोल सिस्टिम (HSVCS) आणि गियर पोजिशनची माहिती मिळेल.

कंपनीने या बाईकमध्ये स्मार्टफोन वॉईस कंट्रोल सिस्टिमही दिली आहे. याद्वारे तुम्ही ही बाईक तुमच्या स्मार्टफोनशी कनेक्ट करु शकता. बाईक फोनशी कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये HSVCS मोबाईल अॅप डाऊनलोड करावं लागेल. त्यानंतर तुम्ही तुमच्या फोनद्वारे या बाईकमधील अनेक फीचर्स हाताळू शकता.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!