Share

‘बहुदा ते माझा चेहरा विसरले असावेत’ ट्वीटर वापरकर्त्याला आर अश्विनच्या पत्नीच उत्तर !

Published On: 

चेन्नई : भारताच्या दुसऱ्या डावात सर्वाधिक धावा अश्विनने आपल्या नावावर केल्या. पण त्याचबरोबर अश्विनने अजून एका विक्रमाला गवसणी घातली आहे. अश्विनने आपलाच एक विक्रम मोडी काढल्याचे पाहायला मिळाले. चेन्नईच्या मैदानात यापूर्वी अश्विनने सर्वाधिक ६७ धावा केल्या होत्या. त्यावेळी प्रतिस्पर्धी संघ इंग्लंडचाच होता. इंग्लंडविरुद्ध २०१६ साली झालेल्या कसोटी सामन्यात अश्विनने ६७ धावांची खेळी साकारली होती. पण कालच्या सामन्यात अश्विनने आपलाच विक्रम मोडीत काढला. आणि नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. अश्विनच्या या खेळीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

दरम्यान गेल्या चार दिवसांत आर अश्विनची पत्नी प्रीती अश्विन  स्टेडियममध्ये उपस्थित राहून टीम इंडियाला आणि आपल्या पतिला पाठिंबा देत होती. मात्र तिच्यावर स्टेडियममधील कॅमेऱ्यांची नजर तिच्यावर एकदाही पडली नाही. एरवी विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा किंवा रोहित शर्माची पत्नी रितीका साजदेह यांच्यावर अनेकदा कॅमेऱ्याच्या नजरा जातात. पण गेल्या चार दिवसांत फक्त एकदाच कॅमेऱ्याची नजर आर अश्विनची पत्नी प्रीतीवर गेली आहे. या चार दिवसांत मैदानातला कॅमेरा अनेकदा रोहित शर्माची पत्नी रितीकावर गेला आहे.

मात्र एका ट्वीटर वापरकर्त्याने हा पक्षपातावर आक्षेप घेत. त्याने एक ट्वीट करत म्हटलं की, ‘गेल्या चार दिवसांपासून आर अश्विन मैदानात अष्टपैलू खेळी करत असताना, मैदानातील कॅमेऱ्याने शेवटी एकदाचं अश्विनच्या पत्नीला टिपलं आहे, जे गेली चार दिवस तिला टाळण्याचा प्रयत्न करत होते.’

संबंधित वापरकर्त्याच्या ट्वीटनंतर अश्विनची पत्नी प्रीती अश्विनने प्रतिक्रिया दिला आहे. तिने ट्वीट करत म्हटलं की, ‘बहुदा ते माझा चेहरा विसरले असावेत’ असं लिहून तिने एक हसणारा इमोजी जोडला आहे. तिचं हे ट्वीट आता इंटरनेटवर वेगात व्हायरल होतं असून अनेक नेटकऱ्यांच्या मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!