Share

किरीट सोमय्यांवरील कारवाईवर गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण, म्हणाले…

Published On: 

मुंबई : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात पोलिसात तक्रार देण्यासाठी कोल्हापूरला येत असलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या कराडमधून परतले आणि कोल्हापुरात होणारा संभाव्य संघर्ष तात्पुरता टळला असल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी पक्षाने त्यांना कोल्हापुरी हिसका दाखविण्याचा दिलेला इशारा आणि स्वागताला भाजपने केलेली तयारी यामुळे कार्यकर्ते एकमेकांना भिडण्याची चिन्हे होती.

यामुळेच रेल्वे स्थानकासह ठिकठिकाणी प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोमय्या माघारी फिरले आणि पोलिसांनी नि:श्वास टाकला. पण या निमित्ताने संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या एका हाय होल्टेज ड्रामावर तात्पुरता पडदा पडला. दरम्यान या सर्व प्रकरणावर आता महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भाष्य केले आहे. तसेच किरीट सोमय्या यांच्यावरील कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही. असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून किरीट सोमय्यांना थांबवण्यात आले होते. तसेच यावेळी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, ‘साधारणतः अशी घटना जेव्हा घडते, त्यावेळी वरिष्ठ अधिकारी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना माहिती देतात. पण याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली की, नाही. मला माहीत नाही. पण यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाचा संबध नाही, याबात जो काही निर्णय घेतला, तो गृहमंत्रालयानं घेतला.

ही वस्तूस्थिती आहे. या कारवाईबाबत शरद पवारांच्या हस्तक्षेपाचा अजिबात प्रश्न उद्भवत नाही. काल जी परिस्थिती कोल्हापुरात जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आली. ती त्यांनी गृहविभागाला कळवली. त्यानंतर दोन्ही पक्ष समोरा-समोर आले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.’ असे स्पष्टीकरण याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!