🕒 1 min read
मुंबई: राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्याची परिस्थिती पुन्हा एकदा चिंताजनक झाली आहे. यावर आवश्यक त्या सर्व उपाययोजना राज्यसरकार करताना दिसत आहे. सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाची लागण होतच आहे, मात्र आता राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण होताना दिसत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितल्या प्रमाणे तब्बल ७० आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे तसेच १५ ते १७ मंत्र्यांना देखील कोरोना झाला असल्याची माहिती टोपे यांनी दिली होती.
राज्यभर पासरणारा कोरोना आता मंत्र्यांच्या कार्यालयातही पसरत असल्याची माहिती समोर आली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या कार्यालयातील २१ कर्मचारी कोरोनाबाधित आढळलेत, तर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या कार्यालयातील २२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. याच सोबत वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि महसूलमंत्र्यांच्या कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती समोर आली आहे.
पुन्हा पसरत असणाऱ्या या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक निर्बंध तसेच कोरोनाचे नियम पुन्हा एकदा कठोर करण्यात आले आहेत. पहिल्या व दुसऱ्या लाटेत झाली तशी अवस्था पुन्हा होणार नाही याची खबरदारी राज्य सरकार तसेच स्थानीक प्रशासन घेत असल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- हेअरस्टायलिस्ट जावेद हबीबवर महिलेच्या डोक्यावर थुंकल्याबद्दल गुन्हा दाखल; व्हिडिओ व्हारयल
- रश्मी ठाकरेंसंदर्भात भाजप नेत्याने केलेल्या टीकेवर किशोरी पेडणेकरांचे प्रत्युत्तर; म्हणाल्या…
- शक्ती कायदा लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य- माधवेश्वरी म्हसे
- ‘हेडमास्तर कुठे हरवले आहेत?’ चित्रा वाघ यांचे गृहमंत्र्यांना पत्र
- मंत्र्याच्या कार्यालयाला कोरोनाचा विळखा! अनेक अधिकारी-कर्मचारी कोरोनाबाधित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
