🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या भाजपचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया(Jiten Gajaria) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या टिप्पणीवर शिवेसना आक्रमक झाली असून यासंदर्भात सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली होती. यानंतर मुंबई पोलीस क्राइम ब्रांचच्या सायबर सेलकडून जितेन गजारिया यांना समन्स बजावण्यात आले होते. जितेन गजारिया यांनी बीकेसमध्ये पोलीस ठाण्यात हजेरी लावत आपला जबाब नोंदवला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) यांनी संताप व्यक्त केला असून राजकारणात नाव कमावण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंच्या सुनेबद्दल असे विधान केले जात असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना पेडणेकर म्हणाल्या की,’जितेन गजारिया कोण आहेत? कांगारुप्रमाणे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांनी भाजपामध्ये उडी मारली आणि आता रश्मी वहिनी व राज्यातील महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करत आहेत.’ तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या सून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी आणि आदित्य ठाकरेंच्या आई असणाऱ्या रश्मी वहिनींना यामध्ये ओढण्याचं कारण काय?आम्ही त्यांना आव्हान देतो जर हे गजारिया आमच्यासमोर आले तर शिवसेनेची महिला आघाडी त्यांना पाहून घेईल, असेही पेडणेकर यावेळी म्हणाल्या आहेत.
दरम्यान, जितेन गजारिया (Jiten Gajaria) यांनी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. जितेन यांनी केलेल्या ट्विटमध्ये रश्मी ठाकरे यांची तुलना राबडीदेवींशी केली होती. यावरून राजकारण चांगलेच तापले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘कोरोना, भीती आणि धास्ती असे भूत जगाच्या मानगुटीवर बसलेत’
- निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
- ‘पंतप्रधान मोदींच्या सुरेक्षेबाबत कोणतीच तडजोड होता कामा नये’
- “भुजबळांनी मला शिकवू नये, त्यांना काय माहिती आयुष्यातील…”, चंद्रकांत पाटीलांनी सुनावले
- “पंतप्रधान देशाचे आदरणीय नेते आहेत, पण त्यांना हे नाटक शोभत नाही”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
