Share

शक्ती कायदा लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य- माधवेश्वरी म्हसे

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : महिलांवरील अन्याय व अत्याचार यावर प्रतिबंध करण्यासाठी विधिमंडळात मंजूर केलेल्या शक्ती कायदा हा देशाला दिशा दर्शक आहे. शक्ती कायदा लागू करणारे महाराष्ट्र हे देशात दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे ज्यांनी हा शक्ती कायदा लागू केला. त्यामुळे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे गरजेचे आहे महिलांनो पुढे व्हा, स्वयंप्रकाशित व्हा, स्वावलंबी व्हा असे आवाहन ॲड. माधवेश्वरी म्हसे(Madheshvari Mhase) यांनी केले. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आयोजित शक्ती कायदा जनजागृती कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या.

शिवसैनिकांच्या मासाहेब स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचा जन्मदिन ममता दिन म्हणून साजरा केला जातो. ममता दिनानिमित्त शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शक्ती कायदा जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या सर्व नियमावलीचे पालन करून आयोजकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. मीनाताई ठाकरे यांना आदरांजली वाहण्यात आली. त्याचप्रमाणे सिंधुताई सपकाळ यांनाही सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी बोलतांना ॲड. प्रतिभा भराड म्हणाल्या की महिलांवरील होणारे अन्याय व अत्याचार विरोधात ठाकरे सरकारने आणलेल्या शक्ती कायद्या बाबत महिलांमध्ये जनजागृती केली. परंतु हिंसाचार, अन्याय, अत्याचार होणारच नाही यासाठी सुद्धा सर्व महिलांनी प्रयत्न करावे असे सांगितले.

स्त्रीला शक्तीची उपमा दिली आहे. महिलांनी या शक्तीचा वापर करून शक्ती कायद्याविषयी जनजागृती करावी असे आवाहन केले. ममता दिनाचे औचित्य साधून शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक प्रतिभा जगताप संपर्क संघटक सुनीता आऊलवार, सहसंपर्क संघटक सुनिता देव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात विविध सामाजिक क्षेत्रातील महिला, वेगवेगळ्या सामाजिक संघटनेच्या महिला प्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क संघटक सुनिता आऊलवार यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुनिता देव यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा जगताप यांनी केले व आभार शहर संघटक विद्या अग्निहोत्री यांनी मानले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!