🕒 1 min read
मुंबई: सुशांतची केस सिबीआयकडे गेल्यानंतरही यातील काही प्रश्न सुटलेले नाहीत. पोलीस तपास करत असताना अभिनेत्री कंगणा रणौतने बॉलिवूडमधील घराणेशाही उघड करत सुशांतच्या निधनामागे बॉलिवूडमधील काही प्रस्थापित चित्रपट माफीया आणि दिग्दर्शकांचा हात आहे, असा आरोप केला. साहजिकच कंगणाचा रोख दिग्दर्शक करण जोहर, महेश भट, आदित्य चोप्रा आणि अभिनेता सलमान खान यांच्याकडे होता. मुंबई पोलिसांनी वरीलपैकी काही लोकांना चौकशीसाठी बोलावलं विचारपूस केली आणि सोडून दिलं. त्यातून काही गोष्टी बाहेर आल्या नाही.
आता दुसरा मुद्दा कंपनाने यात काही बॉलिवूडमधील मंडळी अंमली पदार्थांचे सेवन करतात व त्यांना अंमली पदार्थ पुरवणारी एक मोठी टोळी आहे असंही म्हटले होते. आता काही दिवसांपूर्वी एनसीबीने काही लोकांना अटकसुद्धा केलेली आहे.
पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची काय भूमिका आहे? कारण अशा प्रश्नांची सरबत्ती जेव्हा पत्रकारांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केली तेव्हा ते काहीही उत्तर न देता फक्त हात जोडून निघून गेले. त्यांच्या हात जोडण्यामागं नेमकं काही लपलय का अशी शंका घेतली जात आहे. कारण जेव्हा मुंबई पोलिसांवर आरोप झाले आणि आता बॉलिवूडमधील ड्रग्ज माफीयांना एनसीबीकडून अटक होत असताना ही जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे, त्यांनी याचं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. हा झाला एक मुद्दा!
याआधी सुशांत प्रकरणात महाराष्ट्र सरकार काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असे मोठे आरोप करण्यात आले. मग खरंच असं आहे का? महाराष्ट्र सरकारने कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला याचंसुद्धा उत्तर अनिल देशमुखांनी दिलं पाहिजे. पत्रकारांनी याबद्दल प्रश्न विचारल्यावर ते हाथ जोडून निघून गेले, अशी कोणती गोष्ट आहे जी गृहमंत्री याबाबत पत्रकारांना सांगू ईच्छीत नाही? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचेही या प्रकरणात नाव समोर आले होते. त्यावरही फक्त आरोप प्रत्यारोप झाले, यावरही स्पष्टीकरण आलं तर बरं होईल.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळं वळण मिळालेलं आहे.जेव्हा सुरुवातीला हे प्रकरण घडलं होतं तेव्हा ही सुरुवातीला सुशांतने हे सर्व मानसिक त्रासातून आणि नैराश्यातून केल्याचं बोललं गेलं पण जेव्हा मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा अनेकांनी या प्रकरणात बॉलिवूडमधील प्रस्थापित मंडळींचा हात असल्याची शंका उपस्थित केली. त्यानंतर या प्रकरणाला वेगळी दिशा मिळाली. कोणती संस्था तपास करणार? हे ठरवण्यासाठी प्रकरण महाराष्ट्र व्हाया बिहार सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि सर्वोच्च न्यायालयाने सिबीआयला या प्रकरणाचे तपास करण्याचे आदेश दिले.
एकतर आधीच पुण्यातील जम्बो कोरोना रुग्णालयातील गलथान कारभारामुळे सरकारनचा काय तो पारदर्शकपणा समोर आला आहे. आणि या अशा आरोपांवर गृहमंत्र्यांच्या ‘चुप्पीने’ या आरोपांना बळ मिळू शकते. अजूनही या आरोपांवर चर्चा सुरूच आहे,आतातरी गृहमंत्र्यांनी या सर्व मुद्दयांवर स्पष्टीकरण देतील, अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे ?
महत्वाच्या बातम्या :-
‘पिंपरी-चिंचवड’चा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी अजित पवारांची नवी रणनीती?
तेलगू अभिनेता जयप्रकाश रेड्डी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
‘हरामखोर म्हणजे ‘नॉटी गर्ल’ अन राऊत म्हणजे ‘नॉटी बॉय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
