Share

‘पिंपरी-चिंचवड’चा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी अजित पवारांची नवी रणनीती?

Published On: 

🕒 1 min read

पिंपरी-चिंचवड : २०१४ विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात भाजपची सत्ता आली. त्याआधीच चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकला. लक्ष्मण जगताप हे भाजपाकडून विधानसभा लढले तर महेश लांडगे यांनी अपक्ष लढत नंतर भाजप प्रवेश केला. यानंतर, २०१७ पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांवर देखील याचा परिणाम झाला. अनेक नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपातर्फे निवडणुक लढवली. पिंपरी-चिंचवडमध्ये देखील जगताप-लांडगे समर्थकांनी भाजप प्रवेश केला.

अजित पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपने घवघवीत यश मिळवत सत्ता स्थापन केली तर राष्ट्रवादीला दुसऱ्या स्थानावर समाधान मानत विरोधी पक्षात बसावे लागले. यानंतर, अजित पवारांनी शहरातील सर्व नेत्यांना खुश ठेवण्यासाठी व कारभार चोख राहण्यासाठी विरोधी पक्षनेत्याचा कार्यकाळ १ वर्ष केला. आतापर्यंत संजोग वाघेरे, दत्ता साने, विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी विरोधी पक्षनेत्याचा कारभार सांभाळला आहे. नाना काटे यांचा कार्यकाळ नुकताच संपल्याने काल नव्या विरोधी पक्ष नेत्याची निवड करण्यात आली.

काय आहे अजित दादांची नवी रणनीती?

२०२२ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूका येत असून राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर पक्ष बळकटीला त्यांनी नव्याने उभारी देण्यास सुरुवात केली आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना शह देण्यासाठी त्यांचे खास मित्र असलेल्या राजू मिसाळ यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. खुद्द अजित पवार व पार्थ पवार यांनी मिसाळ यांच्या नावाची शिफारस केल्याचे समजते.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांवेळी मावळ मधून पार्थ पवार यांना तिकीट मिळाल्यानंतर राजू मिसाळ यांनी मोलाचा वाटा निभावला होता. दरम्यान, या विरोधी पक्षनेते पदासाठी नगरसेवक अजित गव्हाणे यांचे देखील नाव पुढे होते, मात्र विधानसभा निवडणुकींवेळी झालेल्या घडामोडी मिसाळ यांच्या गटाने निदर्शनास आणत हा मुद्दा उचलून धरल्याने त्यांचे नाव पिछाडीवर पडले.

तर, येत्या काळात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची देखील बदली होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व हर्डीकर यांची जवळीकता असल्याचे बोलले जाते, त्यामुळेच २०२२ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकी डोळ्यांसमोर ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच हर्डीकर यांची देखील बदली करतील, अशी चर्चा सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या :-

तेलगू अभिनेता जयप्रकाश रेड्डी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

‘हरामखोर म्हणजे ‘नॉटी गर्ल’ अन राऊत म्हणजे ‘नॉटी बॉय’

सुशांतसिंह प्रकरणाला नवे वळण ; रिया चक्रवर्तीची सुशांतच्या बहिणीविरोधात तक्रार

चीन सैन्याकडून लडाखमध्ये गोळीबार , भारतीय जवानांचे ड्रॅगनला चोख प्रत्युत्तर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!