काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहालच्या कुटुंबावर कठीण परिस्थिती ओढावली. युजवेंद्र चहालच्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाली. आर अश्विन पाठोपाठ आता युजवेंद्र चहलच्या घरी देखील तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. युजवेंद्रच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आलं होतं. याची माहिती धनश्रीने आपल्या इन्स्टाग्रामवरून दिली होती.
दरम्यान, युजवेंद्र चहलच्या वडिलांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर आईवर सध्या घरीच उपचार सुरू आहेत. युजवेंद्र आणि धनश्रीसाठी हा काळ किती कठीण आहे तिने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलं होतं.
https://www.instagram.com/p/CO44IIgsTiR/?utm_source=ig_web_copy_link
धनश्रीनंतर आता युजवेंद्रने भावूक पोस्ट शेअर करत आपल्या फॅन्सना मोलाचा सल्ला दिला आहे. युजवेंद्रने आई वडिलांचा फोटो शेअर करत आपल्या प्रियजणांना जपा, असं पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टसह त्याने आपल्या कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे. या फोटो मध्ये धनश्री चहल आणि चहलचे आई-बाबा दिसत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना संसर्गामुळे श्रीलंका दौऱ्यावर प्रश्नचिन्ह! दौरा रद्द होण्याची शक्यता
- कोरोनाविरुद्धच्या लढ्यात धवनने दिलेल्या ‘या’ योगदानाबद्दल पोलिसांनी मानले आभार
- सानिया मिर्झाच्या फोटोवर साक्षी धोनीने केली भन्नाट कमेंट
- कोरोनाविरुद्धच्या लढ्यात इरफानचा पुन्हा पुढाकार ; ‘या’ माध्यमातून मिळणारी सर्व कमाई करणार दान
- ‘या’ कारणामुळे मला संघात जागा नकोय, विजय शंकरने केला खुलासा


