Share

हाताचे तुटलेले बोट असतानाही कमीन्सने रोहित-इशानला धाडले तंबूत

Published On: 

चेन्नई : मगंळवारी चेन्नई येथे झालेल्या आयपीएलच्या अंत्यत चुरशीच्या सामन्यात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने विजयाची गुढी उभारत कोलकाता नाइट रायडर्सचा १० धावांनी पराभव केला आहे. या विजयासोबत मुंबईने या मोसमातील आपल्या पहिल्याच विजयाची नोंद केली आहे. तसेच कोलकाताविरुद्ध विजयाची पंरपरा कायम ठेवली आहे.

या सामन्यात प्रथम फंलदाजी करत मुंबई इंडियन्सने १५३ धावा केल्या होत्या. तर कोलकाताच्या संघाने मुंबईचे सर्व फलंदाज बाद केले. अष्टपैलु आंद्रे रसलनंतर वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने मुंबईचे महत्वाचे दोन खेळाडू कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन यांना बाद केले. तीन चार वर्षाचा असताना एका अपघातात पॅट कमिन्सच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाचा एक सेंटीमीटरचा भाग तुटला होता. मात्र याचा परिणाम त्याच्या कारकीर्दीवर मुळीच झाला नाही.

जगातील अव्वल वेगवान गोलंदाजांपैकी एक असणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला ओळखले जाते. कमिन्स हा कसोटी क्रिकेटमधील जगातील पहिल्या क्रमांकाचा वेगवान गोलंदाज आहे. तसेच तो मर्यादित षटकांच्या सामन्यात देखील उत्कृष्ट गोलंदाजी करतो. आयपीएल २०२० च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स १५.५० कोटी रक्कम मोजून कमीन्सला आपल्या ताफ्यात सामील केले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!