Share

परभणी जिल्हा बंँकेचे उपाध्यक्षपद हिंगोली जिल्ह्याकडे राहणार

Published On: 

परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष – उपाध्यक्ष पदाकरिता मंगळवारी ही निवडणुक होणार आहे. परभणी जिल्ह्याकडे अध्यक्षपद तर हिंगोली जिल्हाकडे उपाध्यक्षपद राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. जिल्हा बँकेत नवनिर्वाचीत 21 पैकी 16 संचालक परभणी जिल्ह्यातील तर 5 संचालक हिंगोली जिल्ह्यातील आहेत. विशेषतः हिंगोली जिल्ह्यातील हे पाच सदस्य जिल्हा बँकेतंर्गत सत्ता संघर्षात महत्वपूर्ण भूमिका वठवत आहेत. अध्यक्ष – उपाध्यक्षपदाच्या या निवडणुकीत सुध्दा त्या जिल्ह्यातील पाच सदस्यांची मते निर्णायक असणार आहेत.
माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर, विद्यमान आमदार राजू नवघरे, राजेश पाटील गोरेगावकर हे तीन निर्वाचीत सदस्य आमदार सुरेश वरपुडकर यांच्या गटात आहेत. माजी खासदार अॅड. शिवाजी माने तसेच आमदार तानाजीराव मुटकुळे हे बोर्डीकर गटाचे आहेत. या निवडणुकीत पाच पैकी तीन सदस्य वरपुडकर गटाच्या सोबत असतील असे चित्र दिसत आहे. तर अन्य दोन सदस्य बोर्डीकर गटाबरोबर राहतील, हे देखील स्पष्ट झाले आहे. अध्यक्ष – उपाध्यक्षपदाच्या या रस्सीखेच स्पर्धेत हिंगोली जिल्ह्यातील संचालकांपैकी एकास उपाध्यक्षपद मिळेल असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. गेल्या निवडणुकीत सुद्धा अंबादासराव भोसले ( वसमत ) यांच्याकडे सत्ता संघर्षात उपाध्यक्ष पद गेले होते.
यावेळीही उपाध्यक्षपद हिंगोली जिल्ह्याकडे राहणार हे निश्चित झाले आहे. तर उपाध्यक्षपदी कोण विराजमान होईल, याबाबत उत्सुकता लागली आहे. वरपुडकर हे स्वतः अध्यक्षपदाचे भक्कम असे दावेदार मानले जात आहेत. त्यांच्या गटाकडून उपाध्यक्षपद हे हिंगोली जिल्ह्याकडे दिले जाणार हे संकेत आहेत. या गटाने उमेदवाराबाबत कमालीचे मौन बाळगले. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्हीबाबत अद्यापही खुलासा केला नाही.

हालचालीतून कोणतेही संकेत देखील मिळत नाहीत.

आमदार बाबाजानी दुर्राणी हे अध्यक्षपदाकरिता बोर्डीकर गटाकडून रिंगणात उतरतील का ? ही उत्सुकतेचा आहे. परंतू दुर्राणी हे देखील काही बोलत नाहीत. जिल्हा मध्यवर्ती बँकेअंतर्गत संख्याबळाचा विचार केला तर वरपुडकर यांचे पारडे जड आहे. उपाध्यक्षपद गोरेगावकर यांचे चिरंजीव राजेश पाटील गोरेगावकर की आमदार राजू नवघरे यांना दिले जाईल, याविषयी परभणीकर तसेच हिंगोलीकरांमध्ये उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!