🕒 1 min read
मुंबई: साउथस्टार अल्लू अर्जुन (Southstar Allu Arjun ) याचा आताच रिलीज झालेल्या ‘पुष्पा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अल्लू अर्जुनने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकलेच शिवाय आता पुष्पाच्या हिंदी रिमेकनेही एक रेकॉर्ड केला आहे.
पुष्पा चित्रपटाच्या हिंदी रीमेकने तब्बल १०० कोटींचा गल्ला (Pushpa reaches Rs 100 crore) कमावला आहे. याअगोदर १०० कोटींचा टप्पा गाठणारे सुपरस्टार रजनीकांत आणि सुपरस्टार प्रभास यांचे चित्रपट आहेत. आता यामध्ये अल्लूअर्जुन याच्या पुष्पा चित्रपटाचाही समावेश झाला आहे.
With #PushpaHindi hitting the ₹ 100 NBOC mark, Icon Star @alluarjun joins an exclusive club of South Stars – #Prabhas and #Superstar @rajinikanth – who have done ₹ 100 Cr NBOC in Hindi..
— Ramesh Bala (@rameshlaus) January 31, 2022
उत्तम संगीत, उत्कृष्ट अभिनय यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. तसेच अल्लूअर्जुन आणि रश्मीकाची जोडीही प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. तसेच “अपुन झुकेगा नही साला” हा डायलॉग सध्या प्रचंड गाजत आहे. त्यातीलच “पुष्पा सुनके फ्लॉवर समझे क्या? फायर है मैं!” या डायलॉगवर अनेक रील्स चाहते बनवत आहेत. चित्रपटातील “श्रीवल्ली” गाणे तर जाम पसंत केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- आ. नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक पोलिसांना शरण; राणेंवर अटकेची टांगती तलवार
- “सलमान हा अफझल खान तर मी छ.शिवाजी महाराजांचा वैचारिक वारस… कोथळा बाहेर काढेन”
- माझा चेहरा शेवटचा बघा, असे वडिलांना म्हणत नवोदित मॉडेल्सची सहाव्या मजल्यावरुन उडी
- “अमृता फडणवीसांना वर्षा बंगला सोडावा लागल्यामुळे त्या फ्रस्टेशनमध्ये”, मनीषा कायंदेंची टीका
- औंरगाबादेत बॅनर लावून बायको पाहिजे म्हणणाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
