🕒 1 min read
औरंगाबाद : पैठण येथील संतपीठाला जागतिक विद्यापीठाचा दर्जा मिळवून देण्याची जबादारी आमची असून या संतपीठात देशासह जगभरातील विद्यार्थ्यांना येथून संतसाहित्याच्या अभ्यासक्रमाची पदवी मिळवता यावी. यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न करणार असून लवकरच या संतपीठाला जागतिक कीर्ती लाभेल. असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
शुक्रवारी रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांच्या प्रमुख ऊपस्थितीत व डॉ. बाबासाहेब मराठवाडा. विद्यापीठाचे कुलगुरू प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली संतपीठ ईमारतीचे औपचारिक लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार डॉ.अंबादास दानवे, समन्वयक प्रविण वक्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी येथील मुख्य सभागृह, वाचनालय, वर्गखोल्या व वसतीगृह आदी विभागांची पाहणी केली. यावेळी झालेल्या जाहीर सभेत बोलतांना ते म्हणाले की, गेल्या ४० वर्षांपासून विविध कारणांमुळे रेंगाळलेल्या संतपीठाचे आता लोकार्पण पार पडले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे शुभकार्य व्हावे. असेच नियतीच्या मनात होते. त्यामुळे हा विलंब झाला असावा. यापुढे आता हे संतपीठ व येथील अभ्यासक्रम तसेच येथील मुलभूत सोईसुविधांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. देशविदेशातील तरुण तरुणींंनी या संतपीठातून आध्यात्म्याचे धडे घ्यावे. चारित्र्य आणि सदाचार यांची सांगड घालणारी नवीन पिढी या संतपीठातून निर्माण व्हावी. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नियोजन करावे. शासन त्यासाठी निधी उपलब्ध करुन देईल. असेही मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनीही मनोगत व्यक्त केले.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणेकरांना बाप्पा पावला; गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत कोरोनामध्ये वाढ नाही – मुरलीधर मोहोळ
- मुंबई ATS अॅक्शन मोडमध्ये; बॉम्बस्फोटाचं प्लॅनिंग करणाऱ्या ‘मुन्ना भाई’ला मुंब्रातून अटक
- ओला ई-स्कूटरची दोन दिवसात तब्बल ११०० कोटींची विक्री
- पाकिस्तानी खेळाडूच्या ‘त्या’ ट्विटवर किवी क्रिकेटपटूचे चोख प्रत्युत्तर
- इव्हेंट खत्म; एकाच दिवशी अडीच कोटी लोकांच्या लसीकरणावरुन राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
