नवी दिल्ली : भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रत्येक दिवशी नवीन वाढ होत आहे. दोन्ही इंधन किंमतींनी बऱ्याच शहरांमध्ये यापूर्वीच १०० रुपयांचा आकडा पार केला आहे. यातच आता आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. आज देशात पेट्रोल 25 पैशांनी आणि डिझेल 30 पैशांनी महाग झालं आहे. त्यामुळे आता सातत्याने होत असलेल्या इंधन दरवाढीमुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत 25 पैशांनी वाढून 101.64 रुपये आणि डिझेल 30 पैशांनी वाढून 89.87 रुपये प्रति लीटरवर पोहोचलं आहे. अशातच मुंबईत पेट्रोल 107.71 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 97.52 रुपये प्रति लिटर इतके झाले आहेत.
दरम्यान, सलग तेलांच्या किमतींमध्ये होणाऱ्या वाढीमुळे मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, ओदिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार आणि पंजाब यांच्यासह 15 राज्यांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार पोहोचल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा झालेल्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- आलिया भट्टच्या ‘कन्यादान’ जाहिरातीविरुद्ध तक्रार दाखल
- महात्मा गांधींचे विचार सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपा तर्फे राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
- भारतीय लष्कराच्या गौरवशाली आणि अभिनास्पद कामगिरीचे दर्शन घडवणारे मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय
- ‘माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देश सोडून फरार?’, अजित पवारांनी दिले उत्तर
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

